आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आळशी डोळ्यांसाठी आता टॅब गेम!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रदीप देशपांडे यांनी वयाच्या सत्तरीत जागतिक दर्जाचे संशोधन केले आहे. त्यांनी लहानमोठ्यांसह चष्म्याच्या नंबरप्रमाणे टॅबवर गेम तयार केले आहेत. ज्यांना सिलेंड्रिकल नंबर आहे त्यांच्यासाठी खास करून कॉम्प्युटर गेम तयार केले असून याचे पेटंटही मिळवले आहे.
डॉ.देशपांडे यांनी सिलेंड्रिकल नंबर असणाऱ्या रुग्णांवर विशेष संशोधन केले आहे. असा नंबर असणाऱ्यांचे डोळे आळशी (लेझी आय)असतात. नेत्रतज्ज्ञ उपचार करताना जो डोळा आळशी आहे त्याला काम मिळावे म्हणून चांगल्या डोळ्यावर कापडी पट्टी लावायचे. परंतु डॉ. देशपांडे यांनी आळशी डोळ्यासाठी कॉम्प्युटर गेम तयार करून ते टॅबवर घेतले. त्यांच्या या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अमेरिकन नेत्र परिषदेने केले कौतुक
डॉ.देशपांडेयांच्या गेम टॅबमध्ये फुलपाखरू पकडणे, तिरंदाजी, सूर्य योगा असे गेम दोन वर्षांच्या बालकापासून ते वयोवृद्धापर्यंतच्या रुग्णांसाठी आहेत. अमेरिकन अकादमी ऑफ पेडियाट्रिक ऑफ्थेल्मोलाॅजीचे प्रमुख प्रा.डॉ. डेव्हिड गायटन यांनी कौतुक केले. त्यांच्या हस्ते गेम टॅबचे उद््घाटन करण्यात आले आहे.

जगभरातनेटवर मिळेल प्रदीप टॅब
डॉ.देशपांडे यांनी संशोधन केलेला टॅब ऑनलाइन जगभरात मिळतो. त्यांचे टॅब गेम वापरून रुग्णही बरे होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते प्रत्येक लहान मुलाचे डोळे शाळेत टाकण्यापूर्वी तपासले पाहिजेत. कारण लहान मुलांना सिलेंड्रिकल नंबर असेल तर ते लवकर थकतात. अभ्यासात मागे पडतात. त्यांच्या समस्या कुणाला कळत नाहीत.

टॅबद्वारे मुलांच्या डोळ्यांचा आळशीपणा कमी करता येतो, असा दावाही ते करतात. जन्मलेल्या बाळाची नजर घरच्या घरी तपासायची असेल तर छतावर दोरा लावून त्याला खेळणी अडकवून ती वर-खाली केल्यास बाळाच्या बुबुळाच्या हालचालींवरून त्याची दृष्टी बरोबर आहे की नाही हे कळते.

डोळा वापरतो ६२ टक्के मेंदूची ऊर्जा
चष्मा लागला तरीही तो वापरणारे आपल्या देशात खूप लोक आहेत. पण तो वापरल्याने माणूस खूप थकतो. एरवी आपला डोळा मेंदूची ६२ टक्के ऊर्जा वापरतो. ज्यांचे डोळे आळशी आहेत किंवा जे लोक चष्मा लागूनही वापरत नाहीत त्यांना लवकर थकवा येतो. कारण त्यांचे डोळे मंेंदूची सर्वाधिक ऊर्जा वापरतात, अशी माहिती डॉ. देशपांडे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...