अंबड - शत्रूसुद्धा झोपेत गोळ्या घालत नाही. माझ्या मुलीला मात्र झोपेत गोळ्या घालून ठार केले. तिची चूक काय? तिचा कट करून खून करण्यात आला असून विलास हाेंडे हा एकमेव आरोपी नाही. यात सासरच्या अन्य मंडळींचाही समावेश आहे.
आपण पाेलिसांना ११ जानेवारी रोजीच सविस्तर फिर्याद दिली. यात तिचा पती सतीश अण्णासाहेब होंडे, दीर डॉ. भरत अण्णासाहेब होंडे, जाऊ डॉ. सीमा भरत होंडे, सासरे अण्णासाहेब होंडे व चुलत सासरे नानासाहेब होंडे या ५ जणांची नावे दिली, मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून या गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी मृत सुमित्रा होंडे यांचे वडील विश्वंभर तारख यांनी पत्रकार परिषदेत केली.