औरंगाबाद - विश्व हिंदू परिषदेच्या वतीने प्रजासत्ताकदिनी भारतमाता पूजनाचा कार्यक्रम कलश मंगल कार्यालयात पार पडला. गोविंददेव गिरी महाराज, कन्नड येथील आनंदचैतन्य महाराज, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दीपक महाराज आंधळे, महानुभाव पंथाच्या रोहिणी शास्त्री कपाटे, इस्कॉनचे डॉ. रमेश लढ्ढा, दीपक महाराज भराडीकर, अन्वा संस्थानचे दीपक महाराज, शीख संप्रदायाचे कौशल, पारस जैन महाराज, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष अप्पा बारगजे, महेश दोरवट पाटील यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम संतांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. स्वामी गोविंददेव गिरी महाराज आणि इतर संतांनी मार्गदर्शन केले. या वेळी धर्माचार्यांसह विविध पंथ-संप्रदायांचे पदाधिकारी तसेच विश्व हिंदू परिषदेचे रामदास लहावर, हेमंत त्रिवेदी, शैलेश पत्की, कुंदा अंदुरे, राजीव जहागीरदार, राजू व्यास, विवेक कानडे, सुधीर नाफडे, सुनील चावरे, काशीनाथ डापके, सचिन राठोड, सुनील अत्रे, सचिन मुळे, लक्ष्मीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.