आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतपत्रिकेवरील अक्षरे असणार अधिक मोठी, केंद्राबाहेर सर्व उमेदवारांची शपथपत्रे लावणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्थानिकस्वराज्य संस्था निवडणुकीत मतदान केंद्रावर जाण्यासाठी दिव्यांग (अपंग) यांच्यासाठी सर्व सोय करण्यात येणार आहेत. मतपत्रिकेवर उमेदवारांचे फोटो नसणार. पण त्यांच्या नावाचे अक्षर मोठे असणार आहे. केंद्राबाहेर सर्व उमेदवारांची शपथपत्रे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना उमेदवारांची माहिती कळेल. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. त्यासाठी निवडणूक आयोग पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आढावा त्यांनी रविवारी सोलापुरात घेतला. महापालिका सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक झाली. 

सहारिया म्हणाले, महापालिकेच्या २६ प्रभागांसाठी १०६७ अर्ज आले. एकूण लाख ७३ हजार मतदार असून, ८९६ मतदान केंद्र आहेत. हजार ३०० कर्मचारी नेमलेले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी २१ लाख ४४ हजार मतदार आहेत. दोन हजार ३४२ केंद्र आहेत. हजार ८०० कर्मचारी नेमलेले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयाच्या मदतीने जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व अर्ज आॅनलाइन पद्धतीने मागवण्यात येत आहेत. मतदानासाठी मनुष्यबळासह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
 
कायदा सुव्यवस्थेविषयी ते म्हणाले, मतदारावर दबाव आणू नये म्हणून प्रशासन काम करत असून, त्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तडीपार, स्थानबद्ध करण्यात येत आहे. पोलिसांचे भरारी पथक असणार आहे. परराज्यातून येणारे महामार्ग, रेल्वेमध्ये तपासणी करून योग्य कारवाई करण्यात येईल. नागरिकांना संपर्क साधता यावे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करता यावे यासाठी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. 

विमान आणि हेलिकॉप्टवर नजर 
परराज्यातून दारू, पैसे खासगी विमान हेलिकॉप्टरने येत असेल त्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली. पण खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच इनकम टॅक्स, सेल टॅक्स अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रीय पक्षांना ४० तर राज्यस्तरीय पक्षांना २० जणांचा समावेश करता येईल, असे सहारिया म्हणाले. या वेळी अप्पर पोलिस महासंचालक बिष्णोई, निवडणूक आयोगाचे सचिव चन्ने, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, मनपा आयुक्त विजयकुमार काळम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आदी उपस्थित होते. 

प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्यावर फौजदारी 
निवडणूक प्रक्रियेसाठी ज्यांची नियुक्ती केली. पण ते गैरहजर राहिले त्यांच्याकडे सबळ कारण नसेल तर त्यांना निलंबित करून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे निवडणूक अधिकारी विजयकुमार काळम यांनी निवडणूक आयुक्त सहारिया यांच्या समोर सांगितले. 

- बॅलेट पेपरवरील अक्षर मोठे असणार 
- मतदान केद्राबाहेर दिव्यांग वृद्धांसाठी रॅम्प. पाणी आणि शौचालय व्यवस्था असेल. 
- उमेदवारांचे शपथपत्र मतदान केंद्राबाहेर लावणार तसेच शहरात वृत्तपत्रात प्रसिद्धीकरण 

पथनाट्य सादर 
मतदान जनजागृतीसाठी नव्याने ग्रामीण आणि शहरी भाषाशैलीत सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. त्यावेळी निवडणूक आयुक्त सहारियासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...