आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनबंदी मोडल्यास शिक्षक सस्पेंड, शिक्षण विभागाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळांतून ज्ञानदान व संस्कार रुजवण्याचे काम होते. या ज्ञानमंदिरांचे पावित्र्य राखले जावे यासाठी शासनाने शाळांत तंबाखू खाणे, विडी, सिगारेट ओढणे, दारू पिऊन व पान खाऊन शिकवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी बुधवारी काढले. राज्यातील जि.प. व इतर शाळांना अंमलबजावणीसाठी पत्रे पाठवण्यात आली आहेत.

शाळेतील तासिकेपूर्वी किंवा शिकवताना काही शिक्षक व्यसन करत असल्याचे यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले होते. याचा मुलांवर विपरीत परिणाम होत असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले होते. ग्रामीण भागात हे प्रमाण शहरी शाळांच्या तुलनेत अधिक असून, व्यसनी शिक्षकांची संख्याही अधिक असल्याचे त्यात नमूद होते. या गंभीर प्रकारांवर निर्बंध घालून ते मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा मुद्दा गेल्या अधिवेशनात गाजला होता. त्यावर अंमलबजावणी म्हणून १४ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेला व तेथून शाळांना आदेश जारी करण्यात आले आहेत.
नियमाप्रमाणे कारवाई
विद्यार्थ्यांसमोर व शिकवताना शिक्षकांनी कुठलेही व्यसन करू नये, हे प्रत्येक शिक्षकाचे प्रथम कर्तव्य आहे. पण काही शिक्षक ते पाळत नाहीत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.
- आर. एस. मोगल. प्राथमिक शिक्षणाधिकारी. औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...