आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात रिमझिम; माेठ्या पावसाची प्रतीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अाैरंगाबाद - जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा एकदा हजेरी लावली अाहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित पाऊस अद्यापही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण अाहे. गुरुवारी हिंगाेली, बीड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी चांगल्या सरी काेसळल्या.
 
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाने तुरळक हजेरी लावली हाेती. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. पाऊस पुन्हा सुरु झाला नसता तर येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. दरम्यान, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अजुनही माेठ्या पावसाची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...