आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्फ बाेर्डाच्या "त्या' जागेची पीआर कार्डमध्ये केली नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वक्फबोर्डाच्या मालकीची क्रांती चौकातील जी जागा खासगी व्यक्तींच्या नावे करण्यात आली होती, त्या जागेचे पीआर कार्ड महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नावाने बनवून घेऊन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम बानो पटेल यांनी मंडळाची कोट्यवधीची जागा वाचवली आहे.
रघवीरसिंग मेहरसिंग याने वक्फच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून वक्फ बोर्डाची क्रांती चौकातील सर्व्हे क्रमांक ७७ वरील एकर २२ गुंठे जागेपैकी काही जागेचे स्वत:च्या नावाने पीआर कार्ड बनवून घेतले होते. त्यानंतर ती जागा दहा हजारांत १३ जानेवारी १९८३ रोजी अवतारसिंग निऱ्हा सरदार रघवीरसिंग निऱ्हा यांच्या नावावर करण्यात आली. नंतर १० ऑक्टोबर १९८५ रोजी श्रीमती हरजिंदर अवतारसिंग यांच्या नावाने करण्यात आली होती. मात्र ती जागा वक्फ बोर्डाची असल्यामुळे बोर्डाने मंगळवारी १८ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नावाने पीआर कार्ड बनवून घेतले. यामुळे कोट्यवधींची जागा वाचवण्यात प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी नसीम बानो पटेल यांना यश मिळाले.

क्रांती चौकातील वक्फच्या जागेचा वाद १९७१ पासून सुरू होता. रघवीरसिंग मेहरसिंग यांनी वक्फच्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही जागा त्यांच्या नावावर करून घेतली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. २०१४ मध्ये वक्फच्या बाजूने न्यायालयाने निकाल िदला होता. वक्फने त्या जागेसंबंधी १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नावाने पीआर कार्ड बनवून घेतले. जिल्हा न्यायाधीश औरंगाबाद यांचे सिव्हिल अपील नंबर २०९। २००१ मधील निर्णयानुसार १८ जानेवारी २०१६ रोजी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नावाने क्रांती चौकातील जागेची पीआर कार्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
गहाळफायलीसंदर्भात बुधवारी बैठक : क्रांतीचौकातील सर्व्हे क्रमांक ७७ च्या मूळ फायली गहाळ झाल्यासंदर्भात सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बुधवारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम बानो पटेल यांनी बोलावली आहे. या बैठकीत या संदर्भातील सत्य समोर येण्याची शक्यता असून जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची नावे उघड होऊ शकतात.

जुनी फाइल शोधण्याचे दिले आदेश
क्रांतीचौकातीलजागेसंदर्भात आणखी कुणी पीआरमध्ये खोटी नोंद करून जागा हडप केली आहे का, याची आम्ही चौकशी करणार आहोत. याबाबतची जुनी फाइल शोधण्याचे आदेश अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ही फाइल कुणी गायब केली असेल, तर त्याच्यावर कठाेर कारवाई करण्यात येईल. नसीम बानो पटेल, प्रभारीमुख्य कार्यकारी अधिकारी
निलंबित बेगला उच्च

न्यायालयाकडून दिलासा नाही
निलंबनाच्याकारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलेला वक्फ बोर्डाचा निलंबित लिपिक इफ्तेखारउल्लाह बेग याला दिलासा मिळालेला नाही. बेग याने त्याच्या निलंबन बदलीप्रकरणी याचिका दाखल केली होती. या प्रकरणी वक्फ बोर्डाने उच्च न्यायालयात १२ जानेवारी रोजी शपथपत्र दाखल केले होते. आजच्या (मंगळवारी) सुनावणीत बेग याला कोणतेही स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे त्याचे वकील एस. पी. तळेकर यांनी एक आठवड्याचा वेळ मागून घेतला. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी २७ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

वक्फच्या लीगल सेलमधून ती फाइल गायब
लीगल सेलचे प्रमुख काजी मिज्बाउद्दीन हे वक्फच्या क्रांती चौकातील जमिनीचा वाद सुरू असताना रजेवर गेले. तेथील लिपिक फईम अख्तर यांनी सांगितले की, मी कालपासून फाइल शोधत आहे, पण सापडत नाही. मिज्बाउद्दीन यांनी ती फाइल नेली आहे की काय माहीत नाही. मला मराठी, इंग्रजी येत नाही. मला लीगल सेलमधील काहीच कळत नाही, असे उत्तर देऊन अख्तर यांनी हात झटकले.