आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोऱ्यांच्या घटनांत वाढ होऊनही वाळूज महानगरातील पोलिस चौक्या मात्र बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगर कामगार वसाहतीसह वाळूज महानगरात मागील काही दिवसांमध्ये बंद घरे फोडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे प्रकार दसरा सणापासून सातत्याने सुरू आहेत.असे असताना परिसरातील पोलिस चौक्या बंद अवस्थेत असल्याने रहिवाशांमध्ये संभ्रम आहे. पोलिस फिरकत नसल्यानेच गुन्हेगारांची हिंमत वाढत असल्याचे परिसरातून बोलले जात आहे. त्यामुळे परिसरातील पोलिस चौक्या सुरू करून गस्त वाढविण्याची मागणी प्रामुख्याने समोर येत आहे.
वाळूज औद्योगिकीकरणामुळे देशभरातून कामाच्या शोधात अनेक जण वाळूज महानगरात अाले. आपली गुन्हेगारी ओळख लपवून याच पद्धतीने अनेक गुन्हेगारही परिसरात वास्तव्यास आले. अनेकांनी मिळेल ती कामे करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धडपड केली. मात्र,गुन्हेगारी करून मौजमजा करण्याची सवय लागलेल्यांची काम करून मिळालेल्या कमी पैशातून पूर्वीप्रमाणे हौस भागेना. त्यामुळे अनेकांनी पुन्हा आपला माेर्चा गुन्हेगारी विश्वाकडे वळवला. त्यासाठी, त्यांनी स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने आपला पसारा वाढविला. त्यातून पोलिसांना आव्हान देत त्यांचा उद्योग सुरू आहे.

२७ सप्टेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान घडल्या घटना : २७सप्टेंबर रोजी रात्री वाळूज एमआयडीसीतील एका कंपनी मॅनेजरला घरी जाताना दोघा दुचाकीस्वारांनी ४३ हजार रुपयांना लुबाडले. १० ऑक्टोबर रात्री मोहटादेवी चौकातून दुचाकी चोरी. ११ आॅक्टोबर रोजी रात्री बजाजनगरातील एलजीचे गोदाम फोडले. तेथील चोरटा सीसीटीव्हीत कैद. याच रात्री प्रतीक डिजिटल दुकान फोडले. १४ऑक्टोबर रोजी एएस क्लबजवळून लाखांची कॅब टॅक्सी प्रवाशाने २० हजार रुपयांच्या रोख रखमेसह पळवून नेली. नोव्हेंबर रोजी सिडकोच्या नगर क्र.एकमध्ये सकाळी १० वाजेला गावी गेलेल्या संजय पाटील पंडित शेळके यांची बंद घरे दिवसाढवळया चोरट्यांनी फोडली. नोव्हेंबर रोजी साऊथ सिटीतील संजय पाटणे यांचे घर फोडून चोरट्यांनी १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नोव्हेंबर रोजी रात्री सचिन अशोक शेठ हे लघुउद्योजक बाहेरगावी गेलेले होते. चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. नोव्हेंबर रोजी पंढरपूरच्या फुलेनगरातून १५ हजार रुपयांचा महागडा एलसीडी चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लांबवला. नोव्हेंबर रोजी रात्री रमेश मोरे चौकातील प्रतीक डिजिटल दुकान फोडून चोरट्यांनी पत्रे उचकटून तब्बल अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. १५ नोव्हेंबर रोजी बजाजनगरातील मनोज पाटील बाहेरगावी असताना त्यांच्या घराचा कडीकोयंडा काढून चोरट्यांनी लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. २० आॅक्टोबर रोजी महाराणा प्रताप चौकातील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. अशा जवळपास १२ विविध घटना घडल्या आहेत. काही घटनांबाबत संबंधितांनी तक्रारीही पोलिसांत दिलेल्या नाहीत.

^पोलिस चौक्यासुरू करण्यात येतील. सध्या साऊथसिटी परिसरात दोन जास्तीचे कर्मचारी गस्तीवर ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर झालेल्या चोऱ्यांचा तपास तातडीने लावून चोरट्यांना जेरबंद केले जाईल. नाथाजाधव पोलिस निरीक्षक,वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे
पोलिस चौक्या सुरू करू

पोलिस चौक्या बंद अवस्थेत धूळ खात पडून
वाळूज महानगरातील गुन्ह्यांच्या घटनांचा वाढता आलेख आहे. मात्र, तरीही पोलिस चौक्या बंद अवस्थेत आहेत. महानगरातील सिडको परिसरात १५ वर्षांपूर्वी पोलिस चौकी बांधण्यात आली. प्रारंभीच्या काळात तेथे कायम एक पोलिस जमादार दोन शिपाई असे तीन कर्मचारी नेमण्यात आले होते. आता मात्र,ही चौकी धूळ खात पडून आहे. खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. त्यामुळे परिसराला उतरती कळा लागली आहे. पंढरपुरातील टपरीवजा असलेली श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिरालगतची पोलिस चौकी, मोहटादेवी मंदिरालगतची पोलिस चौकी सध्या बंद अवस्थेत आहेत. तिथे कोणीही पोलिस कर्मचारी फिरकत नाही.

अनेक घरे दिवसा फोडली
परिसरातील विविध ढाब्यांवर खुलेआम देशी-विदेशी दारू मिळते. गुन्हेगारांची अशा ढाब्यांवर रात्री उशिरापर्यंत ऊठबस असते. तेथूनच त्यांच्याकडून गुन्हा करण्यासंबंधीचे नियोजन होत असल्याची शक्यता बळावते. त्यातून अनेक घरे भरदिवसा फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दीड महिन्यात छोट्या-मोठ्या मिळून तब्बल २२ घटना घडल्या आहेत. यातील एकाही चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
बातम्या आणखी आहेत...