सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप २०१७ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील विविध गावभेटीवेळी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमीर खान आपल्या गावात, माळरानावर येतोय, तो कसा दिसतो? तो काय करेल? हे पाहण्यासाठी ग्रामस्थांची ‘दंगल’ दिसून आली.
गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी येथे अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन होते. सकाळचे पावणेअकरा वाजले तरी आमीरचे दर्शन होत नसल्याने उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. अखेर तो आला, सकाळचे १० वाजून ५० मिनिटे झालेले. कच्च्या रस्त्यावर उतरून बांधावरून सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या गराड्यातून त्याने टेकाड चढले, लगेच येथे करण्यात आलेल्या हजार घनमीटरच्या खोदकामाच्या परिसरात फिरत पाहणी केली. एका चरीमध्ये उतरत त्याने काहीवेळ कामही केले.
यावेळी त्याच्यासोबत पत्नी किरण राव, उपक्रमाचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ, उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती संध्याराणी पवार, सरपंच कविता घोडके-पाटील, शिवाजी घोडके-पाटील उपस्थित होते.
स्पर्धेत हजार ३१५ गावं आहेत. स्पर्धेत हारजित होईल, पण आपण हे काम आपल्या गावासाठी करतोय, ही भावना ठेवा. आजचे हे काम, उद्याच्या पुढच्या पिढीसाठी आहे, तेव्हा ते भान राखत सलोखा जपा, तेव्हाच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल. मी किंवा माझी संस्था निधी म्हणून एक रुपयाही देणार नाही. स्पर्धा केवळ ४५ दिवसांची असली तरी काम श्रमदानाने पूर्ण करा, पुढेही यात सातत्य ठेवा. अण्णा हजारेंनी मला आनंद देण्याने वाढतो हे ब्रीद दिले, तेच मी पुढे नेतोय. ४५ हजार ग्रामपंचायत आणि ८६ हजार गावे राज्यात आहेत. यातून आपला क्रमांक येण्यासाठी काम करा. मुख्यमंत्री फडणवीसही या उपक्रमाबद्दल सकारात्मक आहेत, असे आमीरने सांगितले.
सर्वात स्वस्त हायड्रोमार्कर
खोदकाम आणि जमिनीचा स्तर पाहून पाडण्यात येणाऱ्या चर यासाठी हायड्रोमार्कर नामक यंत्र बाजारात ते हजार रुपयांना मिळते. परंतु येथील युवकांनी हे यंत्र अवघ्या २०० रुपयांत तयार केल्याबद्दल आमीरने आनंद व्यक्त करत कौतुक केले. भाषणावेळी त्यांची विचारपूसही केली.
बाळ आणि बाळाची आजीही
भागाई वाडीतील माळरानावरच्या गुरुवारच्या कार्यक्रमात दोन वर्षाच्या बाळापासून ८० वर्षाच्या आजीही सहभागी झाल्या होत्या. त्यांची तळमळ पाहून शाहरुख खानच्या स्वदेश चित्रपटाची आठवण होत होती. प्रत्येकजण अत्यंत तळमळीने खड्डे मारणे, माती उचलण्याची कामे करीत होता.
पुढील स्लाईडवर वाचा, 100 तालुक्यांत पोहोचणार पाणी फाउंडेशन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)