आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना जिल्ह्यातील १७६ गावांसाठी वॉटर ग्रीड, लाेणीकरांच्या उपस्थितीत अाज भूमिपूजन साेहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजनेच्या धर्तीवर जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा अाणि जालना तालुक्यांमधील १७६ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वॉटर ग्रीड योजना हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी परतूर येथे या योजनेचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.  
  
भूमिपूजनानंतर तातडीने योजनेचे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती लोणीकर यांनी दिली. योजनेच्या पूर्ततेनंतर  तीन तालुक्यांतील संबंधित १७६ गावे ही पूर्णत: टंचाईमुक्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठवाडा हा सातत्याने टंचाई परिस्थितीचा सामना करत आहे. मराठवाड्याचा समग्र विचार करून या प्रदेशाला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. त्याचीच ही एक लहान प्रतिकृती असल्याचेही ते म्हणाले.   या योजनेची ढोबळ किंमत २३४.४१ कोटी रुपये इतकी आहे. निम्न दुधना प्रकल्पातून या योजनेसाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. मंठा तालुक्यातील ९५, परतूर तालुक्यातील ७३ तर जालना तालुक्यातील अाठ गावे अशा एकूण १७६ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होणार आहे. साधारणपणे १ लाख ९५ हजार लोकांना या योजनेचा लाभ हाेईल, असे लाेणीकर म्हणाले.
 
बातम्या आणखी आहेत...