आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटर हार्वेस्टिंगमुळे रेल्वेचा पाण्यावरील खर्च 30 लाखांनी वाचणार; डॉ. ए. के. सिन्हा यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नांदेड रेल्वे विभागाने मान्सूनपूर्व ८०.८५ हेक्टरवर वॉटर हार्वेस्टिंगची कामे पूर्ण केली आहेत. जलपुनर्भरणाच्या माध्यमातून जलस्रोतांची पाणीपातळी निश्चितच वाढणार आहे. औरंगाबादसह प्रमुख ३० रेल्वेस्थानके त्या परिसरातील रेल्वेच्या मोकळ्या जागेत वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात पाण्यावरील खर्चात ३० लाख रुपयांची बचत होईल, असा दावा विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना केला. 

गतवर्ष सोडले तर मागील सहा वर्षांत चार वेळा दुष्काळ पडला होता. जलपुनर्भरण होत नसल्याने त्याची दाहकता प्रचंड जाणवली. लातूरला रेल्वेने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागला. याचा चटका रेल्वे प्रशासनालाही सहन करावा लागला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गत महिन्यात महापालिका प्रशासनाने थकबाकी नसतानाही रेल्वेचा पाणीपुरवठा बंद केल्याने दोन दिवसांत दोनशेपेक्षा अधिक टँकर पाणी विकत घ्यावे लागले. यातून धडा घेऊन यंदा रेल्वे प्रशासनाने पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवणे, जलस्रोतांतील पाणीसाठा वाढवणे त्याचा गरजेनुसार वापर करण्याचे निश्चित केले. त्याच्या अंमलबजावणीसाठी मान्सूनपूर्व जलसंधारण वॉटर हार्वेस्टिंगची कामे उरकून घेतली जात आहेत. 

१६ एप्रिलपर्यंत औरंगाबादसह प्रमुख ३० रेल्वेस्थानके त्या परिसरातील रेल्वेच्या ८०.८५ हेक्टर मोकळ्या जागेत वॉटर हार्वेस्टिंगची कामे पूर्ण केली आहेत. विहिरी, तलावांतील गाळ काढला, स्वच्छता करून पाण्याचा संचय होईल अशी व्यवस्था केली आहे. प्रतिस्थानक पाण्यावरील खर्चात किमान लाख रुपये बचत होईल, असा विश्वास डॉ. सिन्हा यांनी व्यक्त केला. 

सहा लाख रोपांची लागवड...
मराठवाड्यातकेवळ टक्केच वनक्षेत्र उरले आहे. वननीतीप्रमाणे ३३ टक्के वनक्षेत्र असायला हवे. सरकारने सरकारी, निमसरकारी संस्थांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने सहा लाख दहा हजार रोपांची लागवड केल्याचे डॉ. सिन्हा यांनी सांगितले. लागवड केलेले सर्व वृक्ष जगवण्याबरोबरच यंदाही मान्सूनपूर्व वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

असे केले नियोजन...
नांदेडरेल्वे विभागात १०४ रेल्वेस्थानकांचा समावेश आहे. यापैकी प्रमुख ३० रेल्वेस्थानकांची निवड करून इमारतीवर रूफ वॉटर हार्वेस्टिंग रेल्वेच्या मोकळ्या जागेत, जलस्रोताच्या जवळ पावसाचे पाणी जिरवण्यासाठी ते मीटर लांबी रुंदीचे खड्डे खोदले. एकूण ३६६ जलसंधारणाची कामे पूर्ण केली. विहिरी, इतर जलस्रोतांचे नवनिर्माण केले. या माध्यमातून जमिनीत पाणी जिरवणे, संचय करणे, काटकसरीने पाण्याचा वापर करून आर्थिक बचत करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. 
बातम्या आणखी आहेत...