आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात ५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा, पैठण तालुक्यात योजना रखडल्याचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- मराठवाड्यातील सर्वाधिक टँकर पैठण तालुक्यात यंदा सुरू होते. यंदाही दुष्काळात १०० गावांत २०० टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. आता भरपावसाळ्यात ५१ टँकर सुरू आहेत.
एकूणच यंदा पैठण तालुक्यात प्रशासनाने टँकरवर शंभर कोटी रुपये खर्च केले तरीही अनेक पाणीपुरवठ्याच्या योजना अपूर्ण असल्याने टंचाई कायम असल्याची भीषण स्थिती दिसून येत आहे.

पैठण तालुक्यातील कारकीन, वरूडी, पाचलगाव, एकतुनी, एकतुनी तांडा, वळवा तांडा, केकत जळगाव, दाभरूळ, रजापूर, ढाकेफळ, करंजखेडा, थापटी तांडा, पुसेगाव, नानेगाव, यासीमपूर, चौंढाळा, मिटखेडा, चिंचाळा, टाकळी पैठण, हर्षी खु., दरेगाव, विहामांडवा, आखातवाडा, ब्राह्मणगाव, रहाटगाव, सोनापूर, डोणगाव, दादेगाव, पाचोड, थेरगाव या गावांत सध्या टँकरने पाणीपुरवठा होत आहे. यापैकी अनेक गावांत भारत निर्माण योजना राबवली गेली आहे. मात्र, या गावात वर्षभर टँकरने पाणीपुरवठा केला जातो.
टँकर लॉबीला पोसण्याचे धोरण
रोज एका टँकरवर पाच हजारांवर खर्च होतो. यातून टँकर लॉबीला पोसण्याचे धोरण पैठण तालुक्यात राबवले जात असल्याची बाब समोर येत आहे.
योजना राबवूनही पाणी नाही
अनेक गावांत ‘आपले पाणी’ ही योजना भारत निर्माण योजनेअंतर्गत राबवली गेली. मात्र, योजना राबवूनही आजघडीला गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील भारत निर्माण योजनेची चौकशी केली तर गावातील टँकर बंद होऊन गावातच पाण्याची सुविधा निर्माण होईल.
मागणीनंतरच टँकर
पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात पुन्हा ५१ टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावातील मागणीचा विचार करून नंतरच टँकर सुरू केले जातात. सुधाकर काकडे, पाणीपुरवठा
योजना प्रभावीपणे न राबवल्याने टँकर भरपावसाळ्यात सुरू आहेत. पाणीपुरवठ्यातील भ्रष्टाचाराचा गंभीर प्रश्न आहे. विजय जाधव, तालुकाप्रमुख, सेना.