आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीतून 1.67 टीएमसी पाण्याचा अधिक वापर; धरणामध्ये फक्त 4.97 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- शेती पिण्याच्या पाण्याची गरज भागवणाऱ्या उजनी धरणातून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ४९ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी कालव्यातून सहा टीएमसी, बोगद्यातून ०.७४ टीएमसी तर भीमा नदी पात्रातून १.५० टीएमसी असे एकूण ७.६७ टीएमसी पाण्याचा अधिक वापर झाल्याचे समोर आले आहे.

रब्बीचे दुसरे आवर्तन २१ दिवसांचे असताना तब्बल ४४ दिवस कालव्यातून ९.५० टीएमसी पाणी सोडले आहे. शिवाय बोगद्यासाठी एक टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित असताना १.६६ टीएमसी पाणी साेडण्यात आले आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षांतील हा सर्वाधिक पाणी वापर आहे. 

ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंत सिंचनासाठी २६ तर पिण्यासाठी १५.२७ असे एकूण ४१.२७ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. ११७ टीएमसी क्षमता असलेल्या धरणातून एप्रिल अखेरपर्यंतचा हिशेब पाहता ४९ टीएमसी पाणी संपले आहे. रब्बी हंगामातील दोन आवर्तनासाठी ११ टीएमसी पाणी वापरणे अपेक्षित असताना १७.२० टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. 

शहराला पिण्यासाठी १० टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित असतानाा ११.७३ टीएमसी पाणी सोडले आहे. बोगद्याद्वारे दोन पाळ्यातून २.७४ टीएमसी पाणी सोडले आहे, प्रत्यक्षात २.१२ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित होते. शिवाय रब्बीतील दुसरे आवर्तन मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू होते. दोन आवर्तनामध्ये २० ते ३० दिवसांचे अंतर अपेक्षित असताना फक्त १० दिवसांच्या अंतराने उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. 

एका आवर्तनासाठी लागते १६ टीएमसी... 
मागील वर्षी दुष्काळामुळे धरणात कमी पाणी असल्याने कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. त्यापूर्वी २०१४-१५ २०१३-१४ या वर्षी रब्बी हंगामातील एका आवर्तनासाठी १६ टीएमसी पाणी वापरण्यात आले होते. भीमा नदीतून शहराला पिण्यासाठी टीएमसी तर सिंचनासाठी कालव्यातून टीएमसी, बोगदा टीएमसी औद्योगिक, बाष्पीभवन, बॅकवाटर यासाठी टीएमसी असे एकूण १६ टीएमसी पाण्याचा वापर केला जात. यंदा मात्र १९ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आलेले दुसरे आवर्तन ९.४५ टीएमसीचे होते. हे आवर्तन २१ दिवस चालणे अपेक्षित असताना ते ४४ दिवस चालले. उन्हाळी आवर्तन एप्रिलअखेरला सोडणे अपेक्षित असताना ते पहिल्याच आठवड्यात सोडण्यात आल्याने उजनी धरण १०० टक्के भरूनही एप्रिलअखेर वजा पातळीत पोहचले. 

क्षेत्र वाढल्याने वापर वाढला 
उजनी धरणच आठमाही आहे. यामुळे फेब्रुवारीमध्येच सर्व आवर्तन संपले पाहिजेत. पाणी जास्त सोडले. कारण सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. कोठेही पाण्याचा अपव्यवय झाला नाही. शेतकऱ्यांसाठीच धरण आहे, यामुळे त्यांच्या मागणीनुसार पाणी सोडले आहे. यापूर्वी एका आवर्तनाला किती पाणी लागले, हे महत्त्वाचे नाही. ९.४५ काय, त्यापेक्षाही जास्त पाणी लागू शकते. पुणे जिल्ह्यात एकापाठोपाठ एक आवर्तन सोडले जातात तर कर्नाटकामध्ये फेब्रुवारीमध्येच सर्व आवर्तने पूर्ण केली जातात. शेतकरी हा आमचा ग्राहक आहे, त्याच्या मागणीनुसार पाणी सोडले जाते. पाणी संपवले नसून, शेतीसाठी मागणीनुसार पाणी दिले आहे.” - शिवाजीचौगुले, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र प्राधिकरण. 

उजनी धरणातील पाण्याचे वाटप 
>पिण्यासाठी- जुलै : ३.५४ टीएमसी, २१ डिसेंबर : ५.२८ टीएमसी, मार्च : ६.४५ टीएमसी. 
>रब्बी हंगाम आवर्तन- कालव्याद्वारे पहिले आवर्तन १४ डिसेंबर : ६.७० टीएमसी, दुसरे आवर्तन. १९ फेब्रुवारी : ९.५० टीएमसी. 
> बोगदा- १५ डिसेंबर : १.०८ टीएमसी, २० फेब्रुवारी : १.६६ टीएमसी, सीना-माढा उपसा सिंचन योजना : १.०६ उन्हाळी आवर्तन : ६.५० टीएमसी. 
 
पुढील स्लाइडवर वाचा कर्नाटक हद्दीतून पाणी चोरी वाढल्याने पालिकेने औज बंधारा रिकामा केला...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...