आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘जलसंपदा’च्या भरती परीक्षेत दीडशे परीक्षार्थींना मज्जाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जलसंपदा विभागाच्या वतीने वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटतर्फे कनिष्ठ अभियंता पदाकरिता सुरू असलेल्या भरतीप्रक्रियेची ऑनलाइन परीक्षा शुक्रवारी (दि. २५) इंदिरानगर भागातील डब्ल्यूएनएस येथे घेण्यात आली. या परीक्षेसाठी वेळेअाधी अालेल्या १५० पेक्षा अधिक परीक्षार्थींना गेट बंद केल्याने परीक्षा देता आली नाही. त्यामुळे या परीक्षार्थींनी या ठिकाणी गोंधळ घातला होता. सुरक्षारक्षकांकडून करण्यात आलेल्या या अडवणुकीची चौकशी करण्याची मागणी परीक्षार्थींनी केली अाहे.
शुक्रवारी (दि. २५) शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने कनिष्ठ अभियंता या पदाकरिता सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे आयोजन करण्यात अाले हाेते. राज्यभरात ही अाॅनलाइन पद्धतीने परीक्षा तीन सत्रांत घेण्यात अाली. इंदिरानगर भागातील डब्ल्यूएनएस या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात अाली. या परीक्षेसाठी प्रत्येक सत्रात साधारणत: एक हजार परीक्षार्थी हाेते. एकूण तीन हजार परीक्षार्थी हाेते. यासाठी सकाळी ८.४५ वाजेच्या अात परीक्षा कक्षात परीक्षार्थींनी प्रवेश करणे बंधनकारक करण्यात अाले हाेते. त्यानंतर येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना ओळखपत्रावर देण्यात आली होती.

पुन्हा परीक्षेची संधी मिळावी
^जलसंपदा विभागाच्याकनिष्ठ अभियंता पदाकरिता गेल्या दोन वर्षांपासून अभ्यास करत होतो. शुक्रवारी सकाळी वाजता येऊनही परीक्षा केंद्राच्या अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसू दिले नसल्यामुळे पूर्ण मेहनत वाया गेली आहे. ऑनलाइन तक्रार केली आहे. आम्हाला सर्वांना पुन्हा परीक्षेची संधी मिळालीच पाहिजे. -अतुल वाघ, परीक्षार्थी

वेळेवर येऊनही अडवणूक
^येवल्यातून पहाटेच निघून परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचून रांगेत उभे राहिल्यानंतरही परीक्षा देता आली नाही. सकाळी ८.३० वाजताच परीक्षा केंद्राचे द्वार सुरक्षारक्षकांनी बंद केले. -उद्धवनिकम, परीक्षार्थी

झेरॉक्स आणण्याची सक्ती
^परीक्षाकेंद्रात वेळेवर म्हणजे वाजताच पोहोचल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी आेळखपत्राची झेरॉक्स आणण्यास सांगितले. परिसरात झेरॉक्स दुकान सुरू नव्हते. त्यामु‌ळे परतण्यास साडेअाठ वाजले. १५ मिनिटे अाधी पोहोचल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी प्रवेश दिला नाही. -ट्विंकलसोनवणे, परीक्षार्थी

जलसंपदा विभागाच्या भरतीसाठी इंदिरानगर येथे परीक्षा केंद्रात शुक्रवारी अाॅनलाइन परीक्षा झाली. या परीक्षेस मज्जाव केल्याने काही परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घातला.

परीक्षार्थींला मारहाण
परीक्षा केंद्रावर सकाळपासून रांगेत उभे असलेल्या परीक्षार्थींना साडेआठ वाजेनंतर परीक्षा केंद्राच्या गेटवरून बाहेर काढण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा आरोप परीक्षार्थीकडून करण्यात आला. एका परीक्षार्थीने तेथील सुरक्षारक्षकांना याबाबत जाब विचारला असता कर्मचाऱ्यांनी त्याची गच्ची पकडून ऑफिसमध्ये घेऊन जात मारहाण केल्याची तक्रार संबंधित परीक्षार्थीने केली आहे.
बातम्या आणखी आहेत...