आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: हडकोतील जलकुंभासाठी 80 लाख मंंजूर, अंदाजपत्रकावर आयुक्तांची स्वाक्षरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यादव नगरातील अनेक वर्षांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या जलकुंभाचे काम पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्तांनी ८० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्याबाबतच्या अंदाजपत्रकावर त्यांनी स्वाक्षरीही केली असून आता तातडीने निविदा काढण्याचे आदेशही दिले आहेत. हा प्रश्न डीबी स्टारने आयुक्तांपुढे सातत्याने लावून धरला होता. एवढेच नव्हे तर चमूसह आयुक्तांनी या जलकुंभाची पाहणीही केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याअभावी होत असलेली हडकोवासीयांची होरपळ थांबणार आहे. 
 
हर्सूल परिसरातील हरसिद्धी जलकुंभावरच हडकोवासीयांची मदार होती, पण उन्हाळ्यात खूपच हाल होत होते. अगदी हंडाभर पाणी मिळणेही दुरापास्त झाले होते. त्यामुळे वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यादवनगरात जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सिडकोने स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुलाला लागूनच जागा उपलब्ध करून दिली. मनपाने ५० लाखांच्या अंदाजपत्रकासह निधी मंजूर केला. त्यानुसार २० लाख लिटर पाणी क्षमता असलेला जलकुंभ कार्यान्वित होणार होता. २००७ मध्ये ठेकेदाराला बांधकामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला. ठेकेदाराने काम सुरू केले. बीम टाकून सांगाडा उभा केला, पण पुढे मनपाचे आर्थिक गणित बिघडले आणि जलकुंभाच्या कामाला ग्रहण लागले. पुढे त्याने बांधकाम साहित्यात दरवाढ झाल्याने डीएसआरमध्ये बदल करण्याची अट घातली. परिणामी हे काम तब्बल दहा वर्षांपासून रखडले ते रखडलेच. 
 
...आणि उघड झाला घोळ 
परिसरातील नागरिकांनी जलकुंभाच्या कामाबाबत तक्रारी दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्या आदेशाने पाणीपुरवठा विभागाने दोन वर्षापूर्वी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत जलकुंभाच्या बांधकामाच्या सांगाड्याचे स्ट्रक्चर ऑडिटच्या नावाखाली माती परीक्षण केले. त्यात जलकुंभासाठी ही जागाच योग्य नसल्याचा अहवाल आला. त्यामुळे या सांगाड्याचा आधार घेत मनपाने तेथे झोन कार्यालय बांधण्याचा घाट घातला. मात्र, यापूर्वी जागा निश्चिती आणि बांधकाम कशाच्या आधारे केले यावर डीबी स्टारने १७ सप्टेंबर २०१६ रोजी ‘दहा वर्षांनंतर झाला जलकुंभासाठी जागा योग्य नसल्याचा साक्षात्कार' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. 

आयुक्तांकडून दखल 
वृत्तप्रसिद्ध होताच मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी रात्री उशिरा या जलकुंभाच्या अर्धवट सांगाड्याची पाहणी करण्यासाठी मनपातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जागे केले. पूर्वीच्या ठेकेदाराची संचिका शोधली. आणि त्यानंतर अर्धवट जलकुंभाचे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करा, निविदा काढा आणि काम सुरू करा, असे आदेश देत आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी या जलकुंभाच्या कामासाठी ८० लाखांच्या निधीला अंतिम मंजुरी दिली. 

परिसरामधीलया वसाहतींचा प्रश्न मार्गी लागणार 
जलकुंभाचेकाम झाल्यावर यादवनगर, नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, मयूरनगर, द्वारकानगर, सुभाषचंद्र बोसनगर, गजानननगर, दीपनगर, स्वामी विवेकानंदनगर, वानखेडेनगर, सिद्धार्थनगर, पवननगर, पाथ्रीकरनगरसह अन्य वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे. 

इतक्या वर्षापासूनकाम का रखडले याचा शोध घेतला. नेमकी चूक कोणाची हे तपासण्याआधी लोकांची गरज पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. आधी प्रश्न मार्गी लावायला हवा. त्यानंतरच संबंधितांना जाब विचारून कारवाई केली जाईल. ओम प्रकाशबकोरिया, आयुक्त
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...