आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे सेल्फीचे प्रदर्शन, तर कुठे कॅशलेस टेक्नॉलॉजीवर प्रकाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय टेक्नो-एमआयटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी पोस्टर्स प्रदर्शनातून ग्लोबल वॉर्मिंग, कॅशलेस व्यवहार आणि वायरलेस टेक्नॉलॉजीवर प्रकाश टाकला. तिकीट युटिल्टसचे संचालक मुक्तक जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राचार्य संतोष भोसले, संगणक विभागप्रमुख प्रा. कविता भोसले, प्रा. सीमा चौधरी, प्रा. सुषमा देशमुख यांची उपस्थिती होती. 
 
जोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकण्यावर भर दिला पाहिजेत. यासाठी मनातील जिद्द सोडू नये. सातत्य ठेवून ध्येयाकडे वाटचाल करावी. प्राचार्य भोसले म्हणाले की, योग्यवेळीच तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात केल्यास त्याचा भावी आयुष्यात मोठा उपयोग होतो. त्यासाठीचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत. 
 
विद्यार्थ्यांनी दाखवली कल्पकता 
टेक्नो-एमआयटीकार्यक्रमात पुणे, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, जिंतूर येथून अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात व्हर्च्युअल कॅम्पस या स्पर्धेत विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीला सामोरे जाण्याची तयारी व्हावी, त्यांच्यातील निर्णय क्षमता वाढावी आणि आपल्यातील कोणत्या प्रकारची कमतरता आहे याची माहिती व्हावी या उद्देशाने स्पर्धा घेण्यात आली. त्यात आठ विद्यार्थ्यांनी संयोजनाचे काम केले. अॅटिट्यूड टेस्ट, गट चर्चा आणि प्रत्यक्ष मुलाखत या टप्प्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना आला.
 
 सध्याच्या काळात सेल्फी काढण्यासाठी युवकांमध्ये क्रेझ बनली आहे. याच संकल्पनेवर पोस्टर्स प्रदर्शनात एकता डुबे, शीतल डोंगरे, ऋतिका गायकवाड यांनी सेल्फीवर प्रदर्शन मांडले. यात थर्माकॉलपासून मोबाइल, फ्रेम तयार करून लक्ष वेधून घेतले. तसेच कॅशलेस इंडिया या संकल्पनेवर स्नेहल कोलते, भावना काकडे, प्रियंका, शीतल यांनी पोस्टर्सच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारावर जनजागृती केली.
 
 तर नीलेश वाहुळे, प्रदीप आडगावकर, राहुल भाले यांनी भारत विकासात काय बदल झाले त्याचा कसा परिणाम झाला याची कलाकृतीतून माहिती दिली. गरीब आणि श्रीमंती, ग्लोबल वाॅर्मिंगवरही प्रकाश टाकण्यात आला. तर रोहिणी माळी निखत शेख या पुण्याच्या विद्यार्थ्यांनी वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये जी-५ या टेक्नॉलॉजीवर पोस्टर्स प्रदर्शन केले. टेक्नो-एमआयटीच्या स्पर्धेसाठी अभिषेक बुरकूले या विद्यार्थ्यांने बेवसाइट तयार केली तर आरती शिंदे, अक्षदा सिरसाठ यांनी टाकाऊ वस्तूंपासून स्पर्धेसाठी विविध डिझाइन तयार केले. 
 
पुढील स्लाईडवर सविस्तर बातमी आणि फोटो पाहा.... 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...