आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंत्रणा सुस्त, रस्त्यावरचा धोका कायम, व्हाइट टॉपिंगचे काम झाल्यावरही नाही बदलली परिस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- साडेसात कोटी रुपये खर्चून सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौकापर्यंत व्हाइट टॉपिंग रस्ता केला गेला. पण या रस्त्यावर एक्स्प्रेस जलवाहिनीचा मोठा खड्डा मात्र तसाच ठेवण्यात आला. गेल्या ३० वर्षांपासून भर रस्त्यावर हा अत्यंत धोकादायक खड्डा तसाच आहे. रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्याबरोबरच मनपाच्या यंत्रणेचीही ‘दुरुस्ती’ केली तरच असे प्रकार थांबतील. कारण हा खड्डा एवढा भयंकर आहे की, रस्त्यावरील एखादे वाहन कधी या खड्ड्यात अडकून मोठा अपघात होईल हे सांगता येत नाही. 

प्रत्येक रस्त्यावर आणि जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरवासी त्रस्त झाले होते. खाबुगिरीवर जो तो प्रहार करत मनपाला दोष देत होता. खड्ड्यांबाबत रान उठवले गेले, लोकांनी आंदोलने केली, संताप व्यक्त केला. यावर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शहरात व्हाइट टॉपिंगचा मार्ग काढला. त्यातच हा सेव्हन हिल्स ते सूतगिरणीचा रस्ताही तयार करण्यात आला. 

जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तसाच ठेवला
यारस्त्याची लांबी १९२० मीटर असून त्यासाठी कोटी ४० लाख हजार ९४८ रुपये खर्च झाले. हे काम जीएनआय कन्स्ट्रक्शनने केले. यावर तत्कालीन शहर अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता एस. पी. खन्ना, शाखा अभियंता एस. एल. चामले यांनी देखरेख केली. पण रस्ता करताना या रस्त्याच्या मधोमध असलेला एक्स्प्रेस जलवाहिनीचे चेंबरची लेव्हल योग्य करून त्यावर काँक्रीट ढापे ठेवणे अपेक्षित होते. पण त्याकडे कुणीच गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे धोकादायक बनले आहे. 

पत्र दिले होते 
रस्त्याचेकामसुरू करण्याआधी पाणीपुरवठा विभागाला या जलवाहिनीच्या चेंबरची उंची वाढवण्याबाबत पत्र दिले होते. ते त्यांनीच करणे अपेक्षित होते.
- एस.एल. चामले, शाखाअभियंता 
 
पुढील स्लाइडवर पाहा कधी थांबेल ही गळती..?
बातम्या आणखी आहेत...