आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किमीचा रस्ता सिमेंटचा केला तर १५ वर्षांत १.९० कोटींची बचत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खड्ड्यांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत अलीकडे सिमेंट-व्हाइट टाॅपिंगचे रस्ते होऊ लागले आहेत. क्रांती चौक ते रेल्वेस्थानक या चार वर्षांपूर्वी तयार झालेल्या रस्त्यावर अजून एकही खड्डा पडलेला नाही. आतापर्यंत शहरात १०० किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंटचेच करण्यात आले आहेत. त्यावरही पावसाने खड्डे झालेले नाहीत. कारण प्रारंभिक खर्च अधिक असला तरी डांबरापेक्षा सिमेंटच्या रस्त्याचे आयुष्य जास्त आहे. एक किलोमीटर लांबीचा रस्ता करण्यास सध्या दीड कोटी रुपये खर्च येतो. मात्र, तो एकदा केला की पुढील १५ वर्षांतील एक कोटी ९० लाख रुपयांची बचत होते. 
 
२०फूट रुंद अाणि किमी रस्त्याचे उदाहरण 
रस्ता बांधकामातील तज्ज्ञांनी सांगितले की, २०१७ च्या शासकीय दरपत्रकानुसार एक किलोमीटर लांबी २० फूट रुंदीच्या डांबरी रस्त्यासाठी ९० लाख रुपये खर्च येतो. दर तीन वर्षांनी त्यावर डांबराचे कोटिंग करण्यासाठी त्याला २० लाख रुपये लागतात. दहा वर्षांत तीन वेळा कोटिंगसाठी ६० लाख तर १५ वर्षांत कोटी रुपये खर्च होतात. म्हणजे १५ वर्षांत एकुणात कोटी ९० लाख खर्च होतो. शिवाय पावसाळ्यात नागरिकांनी ओरड केल्यावर तीन ते पाच लाख खर्चून डागडुजी होतेच. पण एवढ्याच लांबी, रुंदीचा सिमेंटचा रस्ता केला तर त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिमेंट रस्त्याचे आयुष्य २५ वर्षे असते आणि त्यावर खड्डे पडण्याची शक्यता अत्यंत कमी. दर तीन वर्षांनी डांबराचे कोटिंग करण्याची आवश्यकता नाहीच. म्हणजे ज्या डांबरी रस्त्यासाठी १५ वर्षांत कोटी ९० लाख रुपये खर्च होतो त्याच सिमेंटच्या रस्त्यासाठी २५ वर्षांत दीड कोटी रुपये खर्च येईल. म्हणजे पंधराच वर्षांत ४० लाख वाचतात. पुढील दहा वर्षांत डांबरी रस्त्यासाठी येणारा तेवढाच खर्च (पुन्हा नव्याने रस्ता ९० लाख. तर तीन वर्षांनी वेळा सरफेसिंग ६० लाख) गृहीत धरला तर एकूण कोटी ९० लाखांची बचत होते. 
 
तापमान वाढेल 
^सिमेंट रस्त्यांमुळे शहराचे तापमान वाढण्याचा आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचा धोका आहे. प्रा.दिलीप यार्दी, पर्यावरण अभ्यासक 

डांबरी रस्त्यांचे आयुष्य १५ वर्षे 
अत्यंतदर्जेदार डांबरी रस्त्याचे आयुष्य अधिकाधिक १५ वर्षांचे आहे. मात्र, त्यासाठी दर 3 वर्षांनी डांबराचे कोटिंग, किरकोळ डागडुजी करावी लागते. 

वर्षांतएकही खड्डा नाही 
२०१३ मध्ये क्रांती चौक ते रेल्वेस्थानक या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून एकही खड्डा पडलेला नाही. 

शहराचे तापमान वाढणार 
^शहराचे सरासरी तापमान सिमेंट रस्त्यांमुळे वाढेल. डांबरी रस्त्यांवर वाहनाची पकड असते तशी ती सिमेंट रस्त्यावर असत नाही. परंतु, शहरात वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळे हे रस्ते उपयुक्त आहेत. -प्रा.डॉ. सतीश पाटील, पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ 

दर्जावर लक्ष ठेवावे लागेल 
^सिमेंटच्या रस्त्यांचे आयुष्य किमान २५ वर्षे आहे. आता शासनाने निधी दिल्याने सिमेंटचे रस्ते करणे शक्य आहे. अर्थात या कामांच्या दर्जावरही बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. मुरलीधरसोनवणे, निवृत्त शहर अभियंता. 

असे आहे शहरातील चित्र 
एकूण रस्त्यांची लांबी १४७८ किमी 
विकास आराखड्यातील रस्ते ५०० किलोमीटर 
डांबरी रस्ते ३०० किलोमीटर 
व्हाइट टॉपिंगचे रस्ते 
१०० किलोमीटर (१००कोटींच्या यादीत पुन्हा ३७ किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित) 
पेव्हरब्लॉक बसवलेले रस्ते १०० किलोमीटर 
कच्चे रस्ते किंवा फक्त कागदावरच असलेले रस्ते ४७८ किलोमीटर 
दरवर्षी देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेकडून होणारा खर्च- कोटी 
पॅचवर्कचाखर्च : कोटी 
नवीनरस्त्यांसाठी अंदाजपत्रकीय निधी १५ कोटी (२०१७-१८च्या अंदाजपत्रकानुसार) 

का पडतात खड्डे 
{डांबरी रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी उतार ठेवला जात नाही. 
{ जलवाहिनी, ड्रेनेजलाइन, मंडप उभारणीसाठी रस्ता खोदला जातो. काम झाल्यावर तो पूर्वीसारखा बुजवला जातच नाही. 

१०० कोटींचे गणित 
शासनाने नुकत्याच दिलेल्या १०० कोटी रुपयांतून ३७ किलोमीटर लांबीचे सिमेंटचे रस्ते होणार आहेत. ते डांबराचे केले असते ११० किलोमीटरचे झाले असते. परंतु, तीन वर्षांतच ते खड्ड्यात गेेले असते. म्हणून काँक्रिटीकरणावरच भर देण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...