आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पशुपक्ष्यांची निगा राखणारा वन्यजीव विभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वन्य प्राणी आणि पक्ष्यांची गणना करणे, त्यांची निगा राखणे, त्यांना संरक्षण देणे ही कामे वन्यजीव विभामार्फत केली जातात.  या विभागांतर्गत चार उपविभागांचा कारभार चालतो आणि या उपविभागांतर्गत चार वन्यजीव अभयारण्येदेखील येतात. या सर्व अभयारण्याचे कामकाज विभागामार्फत केले जाते.  इको टुरिझम, ग्राम परिसर विकास कार्यक्रमासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचे काम हा विभाग करतो. आज जाणून  घेऊया या कार्यालयाविषयी... 

गौताळा औट्रम घाट अभयारण्याअंतर्गत कन्नड, नागद आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे तीन परिक्षेत्रे येतात. जायकवाडी पक्षी अभयारण्याअंतर्गत औरंगाबाद, अहमदनगर व पैठण परिक्षेत्राचा समावेश होतो. बीड जिल्ह्यातील नायगाव  मयूर अभयारण्य  उपविभागाअंतर्गत नायगाव आणि बीड परिक्षेत्र कार्यालये आहेत. तर येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्यांतर्गत येडशी, उस्मानाबाद परिक्षेत्र आहेत. 

वन्यजीव विभागाला जिल्हा नियोजन समितीमार्फत अभयारण्य परिसराच्या विकासासाठी निधी दिला जातो. त्या अंतर्गत जलसंधारणाची कामे घेतली जातात व वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय केली जाते. त्याचबरोबर माथा ते पायथा ट्रेंचेस, माती नाला बांध, सिमेंट बंधारे बांधण्यासह वृक्ष लागवड, फळबाग लागवड आणि प्राण्यांसाठी तण लागवड केली जाते. निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी अभयारण्य परिसराचा विकास याच विभागामार्फत केला जातो. हिवरखेड (कन्नड), नागद, पाटणादेवी (चाळीसगाव), जायकवाडी पक्षी अभयारण्य, येडशी आणि नायगाव ही निसर्ग पर्यटन केंद्रे आहेत. 

या आहेत योजना : अभयारण्याच्या परिसरातील गावांमध्ये ग्राम परिसर विकास कार्यक्रम राबवला जातो. यामध्ये ग्रामस्थांचे जंगलांवरील अवलंबन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच अभयारण्य परिसरातील ग्रामस्थांसाठी कुकिंग गॅस योजना राबवली जाते. शासनाकडून निवडक ग्रामस्थांना मोफत गॅस दिला जातो. तसेच वन्यजीव विभागाच्या विविध कामांत लोकसहभागही घेतला जातो.

कार्यालयीन रचना 
उपवनसंरक्षक तथा विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) : कमलाकर धामगे
कार्यालयाशी संपर्क : वन्यजीव विभागीय कार्यालय, विश्वभारती कॉलनी, औरंगाबाद.
दूरध्वनी : ०२४०-२३३१०२७
ई-मेल आयडी : dycfwlabad@mahaforest.gov.in
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...