आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकानाविरोधात महिलांचा वाळूजमध्ये उपोषणाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लायननगर भागातील देशी दारू दुकानासमोरची गर्दी. - Divya Marathi
लायननगर भागातील देशी दारू दुकानासमोरची गर्दी.
वाळूज- अनेकांचे संसार उदध्वस्त होण्यापासून रोखण्यासाठी दारूच्या दुकानांना नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे पत्र गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी मार्चला वाळूज ग्रामपंचायतीला दिले आहे. याच मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यामुळे वाळूजला देशी दारू विक्रीचे दुकान नको या मागणीवरून वातावरण चांगलेच तापणार,असे दिसते. 
 
प्रशांत बंब यांनी तालुक्यात दारूबंदीचा संकल्प जाहीर करून विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर गंगापूर खुलताबाद तालुके दारूमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी सोडला. हा संकल्प तडीस नेताना त्यांनी प्रथम घाणेगाव, जिकठाण,सावखेडा येथे दारूबंदीचे प्रयत्न केले. 
 
दारूमुक्त करण्याच्या निर्णयात अापणही सहभागी व्हावे -आ.बंब 
देशातील राष्ट्रीय राज्य महामार्गावरील देशी-विदेशी दारू विक्रीची सर्व दुकाने, बिअरबार वाइन शॉप हटवण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. ही सर्व दुकाने महामार्गापासून ५०० मीटर पलीकडे नेण्यास न्यायालयाने सांगितले. महामार्गावरील देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने, बिअरबार वाइन शॉप हटवल्यास ३१ मार्च २०१७ नंतर संबंधित दुकानाच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गाव परिसराचे वातावरण चांगले ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या हद्दीत दारू विक्रीच्या दुकानास नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, गंगापूर खुलताबाद तालुके दारूमुक्त करण्याच्या निर्णयात अापणही सहभागी व्हावे, असे ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्रात आ. बंब यांनी म्हटले आहे. 
 
महिला करणार उपोषण 
न्यायालयाच्या आदेशामुळे लायननगरातील देशी दारूचे दुकान अण्णाभाऊ साठेनगरात नेण्याचा घाट घातला जात आहे. तो आम्ही हाणून पाडू, असा निर्धार माजी सरपंच सईदाबी पठाण यांनी बोलून दाखवला. ग्रामपंचायतीने संबंधित दुकानास नवीन जागेसाठी नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी १२५ महिला लवकरच ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. त्याच्या परिणामांची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील,असे माजी सरपंच पठाण म्हणाल्या.
 
या वेळी सुमैया शेख तयब शेख, रुबीना शेख, कविता चांदणे, शाईन शेख, सीमा शेख, निर्मला लव्हाळे, विमलबाई औताडे, पूजा पवार, शोभा पदमे, जाकिरा पठाण, लक्ष्मी भुजंग, सुलतानाबी पठाण, यास्मिन शेख, खैरू पठाण, सना रहीम शेख आदींची उपस्थिती होती. 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...