आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासू-सासऱ्यास पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
औरंगाबाद - पन्नास हजारांसाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या पतीसह सासू सासऱ्याला न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावातवाल यांनी १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली. 
 
नीळकंठ ईश्वरे (२९), श्रीकृष्ण ईश्वरे (६८), कमलबाई ईश्वरे (६५, (रा. छावणी) अशी आरोपींची नावे आहेत. एप्रिल रोजी प्रणिताने गळफास घेत आत्महत्या केली होती. विवाहितेचे वडील अनिल देवगिरीकर (५०, रा. मेहरनगर, जि. अकोला) यांनी तक्रार दिली की, ईश्वरे यांना लग्नाच्या वेळी हुंड्यात ५० हजार रुपये दिले होते. मात्र, हुंडा कमी दिला म्हणून पती नीळकंठसह सासू, सासरे मुलीचा छळ करत होते. दरम्यान, सोन्याची अंगठी आणि गळ्यातील गोफ करण्यासाठी ५० हजारांची मागणी प्रणिताकडे केली होती. ती पूर्ण केल्यामुळे सासरच्यांनी तिला जुलै २०१६ रोजी माहेरी सोडले होते. मात्र, तिसऱ्याच दिवशी नीळकंठ प्रणिताला घेण्यासाठी आमच्या घरी आला होता. त्या वेळी प्रणिताने चिठ्ठी लिहिली होती की, मी सासरी गेल्यानंतर माझे काही बरेवाईट झाले तर त्याला माझ्या सासरचेच जबाबदार राहतील. दरम्यान प्रणिताला सासरच्यांनी लोखंडी पाइपने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...