आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष: शिशुपोषणावर 350 कीर्तनकारांचे प्रबोधन, ओव्यांतून आईच्या दुधाची महती...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्तनपान, शिशुपोषणाकडे अत्याधिक लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने खूप कमी पालक या बाबीकडे गांभीर्याने पाहतात. सुदृढ आणि तल्लख बुद्धीची पिढी घडवण्यासाठी आता कीर्तनकारांनी पुढाकार घेतला. गावागावांमध्ये अध्यात्मातील दाखले देऊन स्तनपान, शिशुपोषणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. बाळाच्या जीवनातील पहिल्या एक हजार दिवसांत त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल ओव्या, अभंगांतून जनजागृती केली जात आहे.  
स्तनपान आणि शिशुपोषण हा विषय कुठल्याही अभ्यासक्रमातही नाही. त्यामुळे कुपोषणासह लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होत आहेत. जन्माला येणारे प्रत्येक बालक सुदृढ आणि हुशार असावे हा उद्देश समोर ठेवून राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य उपोषण मिशन, मुंबई, एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने ‘मां’ (मदर्स अॅब्सॉल्युट अफेक्शन) या उपक्रमाला सुरुवात झाली.  युनिसेफने या उपक्रमाला तांत्रिक मदत आणि अर्थसाहाय्य केले आहे. आतापर्यंत भंडारा, अकोला, परभणी येथे कीर्तनकारांची कार्यशाळा घेण्यात आली. या उपक्रमात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या ३५० हून अधिक कीर्तनकारांना कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

बाळांच्या वाढ, विकासासाठी त्याच्या जीवनात पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असतात. यात गरोदरपणातील २७० दिवस, पहिल्या वर्षीचे ३६५ आणि दुसऱ्या वर्षीच्या ३६५ दिवसांचा समावेश आहे. या दिवसांत माता आणि बाळांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल कीर्तनकार अध्यात्माचे दाखले देऊन समजावून सांगत आहेत. 
 
ओव्यांतून आईच्या दुधाची महती... 
-  माता, बाळाची काळजी कशी घ्यावी याबद्दल संत, महंतांनीही अभंग, ओव्यांतून बरेच काही सांगितले आहे. हीच माहिती आम्ही कीर्तनातून लोकांना देतो. गावागावांत चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रकाश बोधले, अध्यक्ष, वारकरी मंडळ.
 
स्तनपान महत्त्वाचे
- कुपोषणात गेलेल्या बाळाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होतात. पण मातेला सकस आहार, बाळास पुरेसे स्तनपान मिळाल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. 
-पांडुरंग सुदामे, सल्लागार, युनिसेफ.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...