आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीत येताच तिसऱ्या मिनिटाला ‘त्या’ महिलेला मिळाले होते स्ट्रेचर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात गुरुवारी (१५ जून) पहाटे स्ट्रेचरच न मिळाल्याने अपघात विभागासमोरच महिलेची प्रसूती झाल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते. प्रत्यक्षात ती महिला अपघात विभागासमोर आल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत स्ट्रेचर आणि त्याआधीच डॉक्टर तेथे पोहोचले होते. याप्रकरणी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. त्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब उघड झाली आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हे फुटेज दाखवण्यात आले. 
 
घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागाबाहेर सोलनापूर (ता. पैठण) येथील सुनंदा बोर्डे यांची प्रसूती झाली. त्या १५ जून रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास घाटीत आल्या असता डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या टोलवाटोलवीत त्यांना स्ट्रेचर मिळालेच नाही, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्ट्रेचर घेऊन अवघ्या तीन मिनिटांत कर्मचारी महिलेजवळ आले होते, असे स्पष्ट दिसत आहे. 
 
त्याने धमकावले होते 
त्यादिवशी एक समाजसेवक पायाला जखम असलेल्यासाठी स्ट्रेचरची मागणी डॉ. पांढरेंकडे करत होता. तेव्हा त्यांनी सेवकांना सांगून मागवतो, असे उत्तर दिले. त्यावरून पांढरेंना त्याने ‘थांब तुला पाहून घेतो’ असे धमकावले. त्यावरून दोघांत वाद झाला. म्हणून त्याने प्रसारमाध्यमांना महिलेच्या प्रसूती प्रकाराची माहिती दिली, असे अश्विन कुचलकुंठे, निखिल दुभाके या सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

एकक्षणही दवडला नाही : प्रसूती घटनेचे फुटेज मी स्वत: पाहिले. तिच्या मदतीत घाटीच्या कर्मचाऱ्यांनी एक क्षणही दवडला नाही. चौथ्यांदा प्रसूती होणार असल्याने येताक्षणी ती प्रसूत झाली. कळा असह्य होत असताना तिला वॉर्डात हलवणे योग्य नव्हते. म्हणून डॉक्टरांनी अपघात विभागाबाहेरच प्रसूतीचा योग्य निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ती महिला तिचे कुटुंब समाधानाने इथून गेले, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या. 
 
असा होता त्या दिवशीचा घटनाक्रम 
{४ वाजून मिनिटे ४४ सेकंद : सुनंदारिक्षातून आल्या. 
{वाजून मिनिटे २४ सेकंद : कळावाढल्याने त्या अपघात विभागाच्या पायरीवर बसल्या. 
{वाजून मिनिटे ५० सेकंद : डॉ.राहुल पांढरे त्यांच्यापाशी पोहोचले. 
{वाजून मिनिटे १० सेकंद : ब्रदरजगदीश पाटील यांनी स्ट्रेचर आणले. 
{वाजून मिनिट ३८ सेकंद : सिस्टरमाहेश्वरी ऐतवार आणि मंगल वाघही तेथे आल्या आणि तिला प्रसूतीसाठी मदत करू लागल्या. 
{वाजून ११ मिनिटे २० सेकंद : महिलाप्रसूत झाली. 
{वाजून १५ मिनिटे २८ सेकंद : महिला,बाळाला स्ट्रेचरवरून वॉर्डात पाठवण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...