आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगात ‘वाढ’ तर हुंडाबळीच्या घटनांत झाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- महिलांच्यासंबंधीत असलेल्या हुंडाबळी, विनयभंग, बलात्कार आदी घटनांवर आळा बसण्यासाठी शासन कोटी-कोटी रुपये खर्चून विविध योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवर राबवित आहेत. परंतू, यानंतरही प्रशासन महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत आहे. मागील दोन वर्षाच्या कालावधीत बलात्कार, विनयभंग या घटनांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली तर हुंडाबळीच्या घटनांत किंचीत घट झाली आहे. 

गेल्या काही वर्षांत महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. अत्याचारामध्ये कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी शारिरीक शोषण, युवती, महिलांकडून पाहून खुले आम होणारी अश्लील शेरेबाजी, दुकानातील छोटय़ा चेंजिग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यातून तयार होणाऱ्या ‘व्हिडीओ क्लिप’ आदी विविध प्रकारांतून महिला युवतींचे शोषण होत आहे.

दुसरीकडे शासनाच्या विविध विभागामार्फत महिलां, युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी शासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. यासाठी स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महिला मंडळ, पुरुषांचे विविध बचत गट, शाळा, महाविद्यालयांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. तर प्रशासनाच्या महिला बालकल्याण विभागाला याबाबत वेगळा निधीच येतो. या निधीतून जनजागृती करुन अशा घटनांवर आळा बसण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. परंतू, संबंधीत विभाग केवळ कागदोपत्रीच हे उपक्रम राबवितात. यामुळे अजूनही गुन्ह्यांची संख्या कमी होऊ लागली नाही. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या घटनांमुळे महिला, युवतींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर नियंत्रण यावे, अशी मागणी होत आहे. 

वाद मिटविण्यास प्रयत्नशील 
महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये पहिल्यापेक्षा किंचीत प्रमाण कमी झाले आहे. आगामी काळात हे प्रमाण अजून कमी होईल. पोलीस प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- ज्योतीप्रिया सिंह, पोलीसअधीक्षक, जालना. 

पुढील स्लाइडवर पाहा २०१५ ते १७ या वर्षातील महिलांवरील अत्याचार 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...