आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोमबत्ता तलावात बुडून शहरातील तरुणाचा अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दौलताबाद- दौलताबाद येथील मोमबत्ता तलावात अंघोळीसाठी उतरलेल्या शहरातील १९ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. शेख मोबीन शेख साजीद (मकसूद कॉलनी ) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी शेख मोबीन हा दहा ते बारा मित्रांसोबत रिक्षाने दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान तलाव परिसरात गेले. शेख मोबीनसह त्याचे मित्र अंघोळीला पाण्यात उतरले, परंतु तलावाच्या खोलीचा अंदाज आल्याने मोबीन पाण्यात बुडाला. एका मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र यश आले नाही. 
बातम्या आणखी आहेत...