आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकाची तलावात उडी, स्कूटीसाठी तरुणीने घेतला गळफास, तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत नासीर - Divya Marathi
मृत नासीर
औरंगाबाद - शहरात बुधवारी वेगवेगळ्या घटनांत तीन जणांनी जीवनयात्रा संपवली. यात एका विद्यार्थिनीने वडिलांनी स्कुटी घेऊन दिली नाही म्हणून आत्महत्या केली. तर एका रिक्षाचालकाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. त्याला सुरक्षारक्षकाने वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र यश आले नाही. दुसऱ्या घटनेत २० वर्षीय विद्यार्थिनीने घरात गळफास घेतला तर तिसऱ्या घटनेत एका तरुणाचा रेल्वेखाली मृत्यू झाला.
घटना: हर्सूल तलावावर नियुक्त सुरक्षा रक्षक रमेश अभंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ते तलावाच्या मध्यभागी असलेल्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या एका पॉइंटवर कर्तव्य बजावत असताना सकाळी १० वाजून ५० मिनिटांना नासीर शेख गेटमधून पळत आला.
तलावाच्या भिंतीवर उभा राहून त्याने उडी मारली. अभंग यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितले. टपरीचालक विनोद बनकर यांनी घरातून दोरी आणून नासीर याच्या दिशेने फेकली. मात्र तोपर्यंत नासीर पाण्यात बुडाला. अभंग यांनी अग्निशमन विभागाला फोन लावला. २० मिनिटांत सिडकोतील अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्याला पाण्याबाहेर काढून घाटीत हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केले. त्याच्या खिशात उर्दू भाषेत लाल अक्षरात लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या सापडल्या त्यात काय म्हटले याचा तपास रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

मृत्यूपूर्वीपत्नीला फोन : तलावाच्या काठावर नासीरचा मोबाइल सापडला. त्याने घटनेपूर्वी पत्नीला फोन करून हर्सूलचे भाडे मिळाले आहे. घरी येताना मुलासाठी चप्पल घेऊन येतो, असे सांगितले होते.
पैशांची देवाणघेवाण?: नासीरपत्नी, एक मुलगा मुलीसह अंगुरीबाग येथे किरायाने राहत होता. खोकडपुऱ्यातील काही व्यक्तींसोबत त्याचे व्यवहार होते. या व्यवहारातील तणावातून आत्महत्या केली असावी, असे त्याचे सासरे अहमद पटेल यांनी सांगितले.

आठ सुरक्षा रक्षकांची गरज
हर्सूल तलावातील आत्महत्या रोखण्यासाठी मनपाने दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. तलाव उद्यान क्षेत्रफळ ३२५ एकर आहे. ते सांभाळण्यासाठी किमान सुरक्षा रक्षकांची गरज आहे. प्रत्यक्षात दोनच सुरक्षा रक्षक आहेत. त्यांनाही पोहता येत नाही.
बातम्या आणखी आहेत...