आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाकधूक वाढली, 6 हजार 423 उमेदवारांचे भवितव्य ठरणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद / हिंगोली  - मराठवाड्यातील आठ जिल्हा परिषदांच्या ४६० गटांमध्ये २३०६, तर ७६ पंचायत समित्यांच्या ९२० गणांसाठी ४११७ उमेदवारांचे भवितव्य आज (गुरुवार, २३ फेब्रुवारी २०१७) ठरणार आहे. गणाचा दुपारी १२ तर गटाचा १ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
 
लातूर जिल्हा परिषदेतील ५८ गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या ११६ गणांची मतमोजणीची प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली.  प्रत्येक तालुका ठिकाणी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकेची सर्वप्रथम मतमोजणी करण्यात येणार आहे. 
 
गण व गटातील मतमोजणी एकाच वेळी होणार आहे. गण गटापेक्षा निम्म्याने लहान असल्याने गणाचे निकाल लवकर जाहीर होणार आहेत. स्पीकरमधून मिळालेले मतदान सांगितले जाणार असून राऊंडप्रमाणे मिळालेले मतदान तत्काळ ऑनलाइन राज्य निवडणूक आयोगालाही कळवण्यात येणार आहे. 
 
आयोगाकडून निर्णय आल्यानंतर उमेदवारांना विजयी घोषित करून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  लातूर तालुक्यातील मतमोजणी येथील शासकीय निवासी मुलींच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे.  
 
३० टेबलांवर एकदाच मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.  एका टेबलवर चार कर्मचारी नियुक्त केलेे असून मतमोजणीसाठी १५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीच्या किमान २१ तर कमाल २७ फेऱ्या केंद्रनिहाय होणार आहेत.  मतमोजणी ठिकाणांवर पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला आहे.  
 
उमेदवारांच्या मनात धाकधूक वाढली, सेना सत्ता टिकवेल की भाजप मनसुबे उधळ‌णार?
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार असून उमेदवारांच्या मनात धाकधूक निर्माण झाली तर मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता लागली आहे. या स्थितीत जिल्हा परिषदेत शिवसेना आपली सत्ता कायम ठेवेल की भाजप सेनेचे मनसुबे उधळून लावेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  
जिल्हा परिषदेत आजघडीला शिवसेनेचे सहयोगी सदस्यांसह २७ सदस्य आहेत. भाजपचा एकही उमेदवार २०१२ च्या निवडणुकीत निवडून आला नव्हता, तर गेल्या पाच वर्षांतच तेव्हाचा लहान भाऊ असलेला  भाजप आता कारभार हाती घेण्याइतपत प्रौढ झाला आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी स्वबळावर सत्ता येईल एवढी वाढली नाही हेही खरे आहे. त्यामुळे शिवसेना आपली सत्ता कायम ठेवणार की भाजप त्यांचे मनसुबे लावेल हीच चर्चा आहे.
 
 दोन्ही पक्षांनी सर्व ५२ जागा स्वबळावर लढल्या असल्याने त्यांच्यासमोर एकमेकांचे आव्हान तर होतेच; शिवाय दोन्ही काँग्रेसने केलेल्या आघाडीचे आणि बंडखोरांनीही तटबंदी केल्याने शिवसेनेसमोर विजयश्री खेचून आणण्यासाठी आव्हान आहे. त्यामुळे सत्ता कायम ठेवण्यासाठी सेनेला संघर्ष करावा लागणार हे निश्चित असून आज या संघर्षाचा साेक्षमोक्ष होणार आहे. 
 
दुसरीकडे भाजप स्वबळावर सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न पाहत असला तरी त्यांची तेवढी ताकद नाही, असे मानले जात असून भाजप किती जागा मिळवतो आणि शिवसेनेला किती जागांवर गारद करतो याचीच उत्सुकता आहे. आणि या स्थितीतही भाजपने स्वबळापर्यंत आकडा नेला तर ते जिल्ह्याच्या राजकारणातील आश्चर्य ठरेल.
 
 या दोन्ही उजव्या विचारसरणीच्या पक्षांना तगडे आव्हान दिले ते काँग्रेस आघाडीने !  आघाडीने सर्व ५२ जागांवर उमेदवार दिले उमेदवारांंच्या मनात धाकधूक होते, बंडखोरीची संख्या कमी होती. पारंपरिक विरोधच आपसात लढल्यामुळे आघाडीला बहुमताचा आकडा पार करण्याची संधी आहे.
बातम्या आणखी आहेत...