आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रिपल तलाकबाबत अनेक गैरसमज, जनजागृती सुरू, जमाते इस्लामी हिंदचे अता महंमद यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड  - पवित्र कुराणाच्या वचनाप्रमाणे मुस्लिम पर्सनल लॉ बनवण्यात आला आहे. पवित्र कुराणमध्ये  केवळ दोनच तलाक मान्य आहेत. मात्र एका अपवादात्मक स्थितीत प्रेषित महंमद साहब यांनी अत्यंत नाराजीने एकत्रित तीन तलाक मान्य केले होते तसेच हा गुन्हा मानून असे ट्रिपल तलाक देणाऱ्या व्यक्तीला शिक्षाही दिली होती. पुढे काळाच्या ओघात ही रीत बनली. धर्माची पूर्ण माहिती नसणाऱ्या काही मुस्लिम धर्मीय लोकांमुळेच इस्लाम धर्माचा अपप्रचार होत असून यासाठी जमाते इस्लामी हिंदच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याची माहिती  संघटनेचे अध्यक्ष अता महंमद यांनी  रविवारी  दिली. 

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जमाते इस्लामी हिंदचे माजी अध्यक्ष शेख आसिफ, संघटनेचे सदस्य शेख मुजीब, सद््भावना मंचाचे सदस्य प्रा.रंगनाथ लहाने, प्रा.डॉ.अंबादास सगट, डॉ.यशवंत पवार, गुलाम नबी यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी अता महंमद यांनी ट्रिपल तलाक, महिला पडदा पद्धत व दुसऱ्या लग्नासंदर्भात पवित्र कुराणात दिलेल्या माहितीचे सविस्तर विवेचन केले.  
 
ते म्हणाले की, भारतीय घटनेने सर्व धर्मांना कायद्यानुसार आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे मुस्लिम धर्मीयांना ट्रिपल तलाक, एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा अधिकार आहे. कुराणात दिलेल्यानुसार मुस्लिम पर्सनल लॉ बनवलेला असल्याने त्यात बदल करण्याचा कुणालाही अधिकार नाही. सध्या मुस्लिम पर्सनल लॉ विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार सुरू असून यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याला देशात तडा जाताना दिसत आहे.  या वेळी अब्बास खान, शेख मकसूद, युनूस खान, अब्दुल रहीम मन्सुरी, जानी मन्सुरी, शरीफ सौदागर, शेख हाफीस, शेख अबू, मोहसीन रंगरेज, महंमद असद आदी उपस्थित होते.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...