आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाने साकारले ‘मायक्रो ग्रंथालय’, तब्बल सातशे ग्रंथांचा संग्रह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खजिना - Divya Marathi
खजिना
गुजरातमधील राजकोटचे रहिवासी असलेल्या २४ वर्षीय निकुंज वगाडिया याने ज्ञानभांडार वाढवणारा छंद जोपासला आहे. त्यांनी लहान आकारातील पुस्तके, ग्रंथांचा अनोखा छंद जोपासला आहे. त्यांच्या या छंदाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे. त्यांच्या संग्रहात तब्बल सातशे ग्रंथांचा संग्रह आहे. यात धार्मिक ग्रंथ, थोर नेते, कलाकारांच्या पुस्तकांचा समावेश आहे. हा संग्रह आबालवृद्धांसाठी आकर्षण ठरला आहे. 
 
वडिलांकडून मिळाली प्रेरणा
राजकोटमध्ये निकुंज याचे वडील रसिकभाई वगाडिया प्राध्यापक होते. त्यानी १९९८ मध्ये निकुंजला सुक्ष्म आकारातील भगवतगीता भेट म्हणून दिली होती. त्या वेळी निकुंज केवळ पंधरा वर्षांचे होते. त्यांना ही लहान आकाराची भगवद््गीता खूप आवडली. तिला नवीन स्वरुप देण्याचे ठरवले. तिला अजून आकर्षित बनवले. यातून त्यांना अशा लहान लहान आकारातील पुस्तिका जमा करण्याचा छंद लागला.
 
रामायण, भगवद्गीता , कुराण
निकुंज याच्याकडे २ इंच आकाराची हनुमान चालिसा, १५ बाय २० सेंटिमीटर आकारातील महात्मा गांधी यांच्यावरील आत्मकथा, रामायण, महाभारत, भगवद््गीता, कुराण, चार्ली चॅप्लिन, दलाई लामा, जिजस क्राईस्ट, एलिझाबेथ-२, हॅरी पॉटर, रोमन स्टोरी, विश्वप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तके आणि विविध विषयांवरील ७०० पुस्तकांचा संग्रह आहे.
 
हनुमान चालिसा
निकुंज याच्याकडे एक छोटीशी हनुमान चालिसा आहे. ही चालिसा दिसण्यास खूप सुंदर आणि आकर्षक आहे. तिचा आकार केवळ  २ इंचच आहे. पुस्तकेत केवळ पंधरा ते वीसच पाने आहेत. ही पुस्तिका लक्ष वेधून घेते. काही पुस्तिकांची भाषादेखील समजण्यास सोपी आणि सुटसुटीत आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
- जागतिक स्तरावर नोंद
- लहान पुस्तकांना आहे अजूनही महत्त्व... ​
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...