आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचिकलठाणा एमआयडीसीत लोंबकळणार्या तारा अखेर जीटीएलने सरळ केल्या. या तारांमुळे एकाचा बळी गेल्यानंतर काही उद्योजकांनी त्या सरळ करण्यासाठी जीटीएलकडे पाठपुरावा सुरू केला होता; पण त्यात अपयश आले. डीबी स्टारने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच जीटीएलने या तारा ओढून सरळ केल्या. यामुळे उद्योजकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, तर औद्योगिक परिसरात ये-जा करणार्या हजारो नागरिकांचा जीवही यामुळे भांड्यात पडला आहे.
चिकलठाणा एमआयडीसीतून 11 केव्हीची लाइन गेली आहे. या तारा लोंबकळत असल्यामुळे जीवघेण्या ठरत होत्या. विशेषत: वोक्खार्ट रिसर्च लॅबपासून गोल्डन ड्रीम्सकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर या तारा खूपच खाली आल्या होत्या. गेल्यावर्षी एक वाहन या तारांना चिटकल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर जीटीएलने एक खांब बसवून काही तारा ताठ केल्या. तरीही अनेक ठिकाणी त्या लटकत होत्या. अलीकडेच एका दूधवाल्याचा जीव बालंबाल बचावला. इथल्या उद्योजकांनीही या तारांची उंची वाढावी म्हणून जीटीएलचे उंबरठे झिजवले; पण एक बळी गेल्यावरही जीटीएलचे डोळे उघडले नाही.
या गंभीर प्रकाराला डीबी स्टारने ‘तारांचा झोका, जीटीएलच्या झोपा’ या वृत्तात वाचा फोडली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याप्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तर उद्योजकांनीही उद्योगमंत्री नारायण राणे यांची औद्योगिक क्षेत्रावरील हे संकट दूर करण्यासाठी भेट घेण्याची तयारी केली होती. परंतु, वृत्त प्रकाशित होताच कंपनीचे प्लॅनिंग इन्चार्ज योगेंद्र आष्टीकर, अभियंते सचिन आठवले आणि देखभाल आणि दुरुस्ती विभागाचे प्रमुख सय्यद शहा यांनी तत्काळ त्या जागेची पाहणी करून अहवाल तयार केला. त्यानंतर जीटीएलने लोंबकळणार्या तारा उंच केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.