आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगपुऱ्यातील पार्किंगमध्ये चार कार जाळल्या, रात्री पार्किंगमध्ये होत्या २० कार, मोठी हानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगपुऱ्यातील एसबी कॉलनीजवळ जनता बाजारसमोरील पार्किंगमध्ये सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने चार कार जाळल्या. सहा महिन्यांपासून थांबलेले गाड्या जाळण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याचे नागरिकांमध्ये दहशत आहे. यापूर्वी मुकुंदवाडी, जयभवानीनगर आणि वाळूज परिसरात दुचाकी जाळल्याच्या घटना घडल्या होत्या. 

सोमवारी पार्किंगमध्ये २० कार उभ्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास आग लागल्याचे परिसरात राहणाऱ्या अनिल जाधव, गांधी, मुधळवाडकर यांना दिसले. त्यांनी तत्काळ ही बाब पार्किंग चालकाला सांगितली. अग्निशमन विभागाला फोन करण्यात आला. तोपर्यंत कार जळून खाक झाल्या होत्या. तर चौथ्या कारने पेट घेण्यास सुरुवात केली होती. मात्र नागरिकांनी आग विझविली. पार्किंगला लागूनच सरस्वती भुवन कॉलनी आहे तर दुसऱ्या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स वर्तमानपत्राचे कार्यालय आहे. वेळीच आग आटोक्यात आली, अन्यथा मोठे अग्नितांडव झाले असते. ही पार्किंग विनोद नरवडे चालवत असून शुभम लाहोट नावाचा कर्मचारी काम पाहतो. या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कारण अस्पष्टच : हीवाहने का जाळली याचे कारण स्पष्ट झाले नाही. प्रथमदर्शनी एखाद्या माथेफिरूचे हे काम असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा, पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्यासह क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. राज्य गुप्तचर विभाग आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही माहिती घेतली. 

या अगोदरही कार जाळण्याचा झाला होता प्रयत्न : याआगोदरही संतोष बागला यांची कार जाळण्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती पार्किंग चालकाने दिली. मात्र, या घटनेनंतरही येथे सीसीटीव्ही बसवण्यात आले नाही. आग विझविण्ययाची कुठलीही यंत्रणा येथे नाही. दरम्यान, ही आग का लागली, पार्किंग चालकाचे कोणासोबत भांडण झाले का, येथील रहिवाशांनी एखाद्या संशयिताला पाहिले का याचा शोध पोलिस घेत आहेत. 

पार्कींग चालकाने केले हात वर : याघटनेनंतर पार्कींगवाल्याने मात्र हात वर केले. पार्कींगची सुविधी सकाळी सात वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत आहे, असे पार्कींगच्या पावतीवर स्पष्ट लिहिले आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्कींमध्ये गाडी लाण्यासाठी महिन्याला सहाशे रुपये द्यावे लागतात. 

माथेफिरूने या कार जाळल्या 
इनोव्हा(एमएच २० सीवाय ७८८८) या कारचे मालक सुनील जैस्वाल असून त्यांचे याच भागात स्पायसी कॉर्नर हे दुकान आहे. हुंदाई इऑन (एमएच २० डीजे १०३६) ही कार गाडी संतोष बागला यांनी दहा-बारा दिवसांपूर्वीच घेतली होती. त्यांचे याच परिसरात गाऊन हाऊस नावाचे दुकान आहे. अल्टो (एमएच २० डीजी २६१३) ही कार वीरेंद्र पाटील यांची आहे. हुंदाई व्हर्ना (एमएच २० सीएस ४७७७) ही कार देखील जळाली असून तिचे मालक अनिल डुगलज आहेत. मात्र त्यांनी ही गाडी दुसऱ्याला विकल्याचे कळते.  
बातम्या आणखी आहेत...