आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी असो वा दसरा, सेवेचे व्रत सुरूच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दिवाळीला सर्वजण गावी जाण्याच्या घाईत असतात. दिवाळी असो की दसरा, नित्यनेमाने जबाबदारी पार पाडताना कुठेच अडचण वाटत नाही. रेल्वे वेळेवर चालवताना सुखरूप प्रवास घडवून आणण्यातच धन्यता वाटते. प्रवाशांच्या चेहर्‍यावरील हास्य समाधान देऊन जाते, अशी प्रतिक्रिया लोकोपायलट महेंद्र पखाले यांनी व्यक्त केली. पखाले मूळचे नागपूरचे त्यांचे कुटुंब नांदेडला स्थायिक आहे. कर्तव्यादरम्यान त्यांना औरंगाबाद, परळी, पूर्णा आदी स्थानकांवरील विश्रांती कक्षात थांबावे लागते. पखाले यांनी 2 नाव्हेंबर रोजी औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर परळीपर्यंत नेली. रविवार 3 नोव्हेंबरला ते आणि त्यांचे सहकारी परळीहून पूर्णापर्यंत दुसर्‍या रेल्वेला नेतील. रेल्वेत लोकोपायलट म्हणून सेवा सुरू केल्यानंतर प्रारंभी घरची आठवण यायची. परंतु आता सवय झाल्याचे त्यांनी सांगितले. सुट्यांमध्ये बच्चे कंपनीस मामाच्या गावाला जायची घाई असते. मामाच्या गावाला जाताना रेल्वेने प्रवास करायला त्यांना आवडते. प्रवाशांना सुखरूप तथा वेळेवर प्रवास घडवून आणण्यावर नेहमीच भर दिला जातो. प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद हिच आमच्या कार्याची पावती असल्याचे पखाले यांनी सांगितले. लोकोपायलटला सार्वजनिक जीवन नसल्याचे पखाले यांनी सांगून, आम्हाला रेल्वे नेण्यासाठी विश्रांती घ्यावी लागते व रेल्वे सोडल्यानंतरही विश्रांती घ्यावी लागत असल्याचे सांगितले. नियमित 48 तासांनंतर 10 ते 12 तासांसाठी घरी जायला मिळते.