आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराते मराठवाड्यातील पहिले दलित पदवीधारक होते..निझाम सरकारच्या सन्मानाच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवून त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला.. गोविंदभाई श्रॉफ यांच्या खांद्याला खांदा लावून लढा दिला..स्टेट शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून निझाम सरकारविरोधी जहाल पत्रके वाटली..डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी म्हणून मराठवाड्यातील दलित, शोषित वर्गात शिक्षणाबाबत जागृती केली. असे हे सेनानी म्हणजे भाऊसाहेब मोरे..त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महापालिकेने 2001 मध्ये शहरात त्यांचा पुतळा बसवण्याचा ठराव मंजूर केला. त्यासाठी जागा, आराखडा आणि निधीही मंजूर झाला; पण पालिकेचे कंरटे प्रशासन आणि पदाधिकार्यांच्या अनास्थेमुळे 12 वर्षांनंतरही या स्वातंत्र्यसेनानीचा पुतळा कागदावरच आहे. प्रशासनाला जाग यावी म्हणून आज "जयभीम" या घोषणेच्या हिरक महोत्सवानिमीत्त हे विशेष वृत्त देत आहोत.. 30 डिसेंबर 1938 रोजी कन्नड येथील मकरणपूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मराठवाड्यातील पहिली सभा भाऊसाहेब मोरे यांनी घेतली होती. याच सभेत भाऊसाहेबांनी 'जयभीम' ची घोषणा दिली. त्यासोबत हैदराबाद मुक्तीसंग्रामातही ते सक्रीय सहभागी होते.
हैदराबाद मुक्तिसंग्राम म्हणजे धगधगते अग्निकुंडच. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला असला तरी हैदराबाद प्रांत निझामाच्या जुलमी राजवटीत बंदिस्त होता. निझामाच्या पारतंत्र्याची बंधने तोडण्यासाठी अनेक तरुणांनी घरादाराचा आणि संसाराचा त्याग करून स्वातंत्र्यसमरात उडी घेतली. त्यांच्या त्यागामुळेच 17 सप्टेंबर 1949 रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. मात्र, या स्वातंत्र्यसेनानींचा गौरव करण्याकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. भाऊसाहेब मोरे त्यापैकीच एक.
बाबासाहेबांना मराठवाड्याचे निमंत्रण
भाऊसाहेबांच्या कार्याबद्दल माहिती देताना प्रवीण मोरे म्हणतात, भाऊसाहेबांनी लहानपणापासूनच निझामाची राजवट बघितली होती. निझामाचे अत्याचार पाहून त्यांचा संताप व्हायचा. या काळातच ते डॉ. बाबासाहेबांच्या विचारांनी भारावले. 1935 मध्ये येवल्यात त्यांनी बाबासाहेबांचे भाषण ऐकले. भाऊसाहेब बाबासाहेबांची भेट घेऊन म्हणाले, ‘तुम्ही मराठवाड्याच्या सीमेपर्यंत आला आहात. आणखी पुढे या. मराठवाड्याला तुमची गरज आहे. येथे दलितच नव्हे, तर इतर समाजही निझामाच्या जुलमी कारभाराने त्रस्त आहे.’ बाबासाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारले आणि मराठवाड्यात सभा घेण्याचे आश्वासन त्यांना दिले. या सभेच्या संयोजनाची सगळी जबाबदारी भाऊसाहेबांकडे आली.
पुढील स्लाइडमध्ये, सभा मकरणपूरलाच का ? कोण होते भाऊसाहेब मोरे...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.