आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश मिळताच काही तासांत पोलिस आयुक्तपदी यादव रुजू; अमितेश कुमार आज मुंबईला रवाना होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवे आयुक्त यशस्वी यादव यांना पदाची सूत्रे देताना अमितेशकुमार. - Divya Marathi
नवे आयुक्त यशस्वी यादव यांना पदाची सूत्रे देताना अमितेशकुमार.
औरंगाबाद- औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून ठाण्याचे अपर पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना औरंगाबादचे पोलिस आयुक्तपद सोपवण्यात आले आहे. बदलीचे आदेश मिळताच अवघ्या काही तासांत विमानाने येऊन यादव यांनी सायंकाळी पदभारही स्वीकारला. मावळते पोलिस आयुक्त अमितेश कुमारही शनिवारी सकाळी विमानाने मुंबईला जात आहेत. 

हेल्मेट सक्तीपासून शहरात चर्चेचा विषय ठरलेल्या अमितेश कुमार यांनी रिक्षाचालकांवर कारवाई करणे आणि गुंडांना धाक निर्माण करणे यातून लोकप्रियता मिळवली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या बदलीची चर्चाही सुरू झाली होती. गुरुवारी मध्यरात्रीनंतर गृह विभागाने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यात अमितेश कुमार यांचाही समावेश होता. 

औरंगाबादच्याआयुक्तपदाचा दर्जा घटवला 
आतापर्यंतऔरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्तपद हे विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे होते. मात्र, काल रुजू झालेले आयुक्त उपपोलिस महानिरीक्षक दर्जाचे आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या पोलिस आयुक्त पदाचा दर्जा घटवण्यात आला आहे. यशस्वी यादव यांच्यासाठी हा दर्जा घटविण्यात आला की दर्जा घटविल्यामुळे यादव यांची नियुक्ती होऊ शकली हे स्पष्ट होऊ शकले नाही. 

नवे आयुक्त हे गाजणारे व्यक्तिमत्त्व 
नवे पोलिस आयुक्त यशस्वी यादव मूळचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. मात्र, २०१२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार आल्यानंतर यादव यांची प्रतिनियुक्तीने उत्तर प्रदेशमध्ये बदली झाली होती. कानपूर उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ येथे ते वरिष्ठ पोलिस अधीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांचा हा संपूर्ण कार्यकाळ वादग्रस्त चर्चेत राहिला. अखिलेश यादव यांचे ते मित्र असल्याची चर्चा आहे. 

कम्युनिटी पोलिसिंगवर भर 
ज्याप्रमाणेऔरंगाबाद शहर पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अमितेश कुमार यांना साथ दिली, त्याचप्रमाणे मलाही ते सहकार्य करतील आणि त्यांच्या सहकार्यामुळे शहर पोलिस दलाची प्रतिमा आम्ही नक्की उंचावू, असा आत्मविश्वास नव्या आयुक्तांनी व्यक्त केला आहे. आपला कम्युनिटी पोलिसिंगवर भर असेल, असेही त्यांनी सायंकाळी स्वागत समारंभात सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा...
‘औरंगाबादेतील ही दोन वर्षे आयुष्यभर लक्षात राहतील’; अमितेशकुमार यांचे भावोद्गार...
बातम्या आणखी आहेत...