आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लू व्हेल हा फक्त गेम किंवा अॅप नव्हे, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांनी तयार केलेले मृत्यूचे जाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ब्लू व्हेल... मागील काही दिवसांत मुंबईतील एका नववीच्या विद्यार्थ्याने या गेमच्या नादात जीव दिला. त्यानंतर सोलापूर व इंदूरसारख्या शहरातील मुलेदेखील ब्लू व्हेलच्या जाळ्यात अडकल्याच्या बातम्या अाल्या. मुले एक खेळ समजून त्यांच्या माेहजालात अडकत अाहेत. तसेच साेशल मीडियावर ब्लू व्हेल अॅपचा शाेध घेतला जात अाहे; परंतु वास्तवात हा गेम नाही व अॅपदेखील नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांनी तयार केलेले जाळे अाहे, ज्याने अातापर्यंत जगभरातील १३० जणांचा जीव घेतला अाहे. ‘ब्लू व्हेल’च्या मागे माॅस्काेच्या फिलीप बुडेइकिकचा मेंदू अाहे. त्याला अटक झाली असून, त्याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात अाली अाहे.

याबाबत फिलीपला पकडणाऱ्या तपास संस्थेचे प्रमुख अॅन्टाॅन ब्रिडाे सांगतात की, याची सुरुवात २०१३मध्ये झाली. त्या वेळी फिलीपने व्हीके (युराेपातील लाेकप्रिय साेशल मीडिया)वर मुलांना अाकर्षित करण्यासाठी ‘एफ ५७’ नामक  ग्रुप बनवला. या ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांना ताे हाॅरर व्हिडिअाे दाखवायचा. जास्तीत जास्त मुलांना फसवायचा त्याचा हेतू हाेता. हजाराे व्ह्यूअर्समधून फक्त २०-३० जणच त्याचे खरे शिकार असत. ताे लहान मुलांना छाेटे-छाेटे; पण खतरनाक टास्क द्यायचा. उदा- इमारतीच्या टाेकावर संतुलन ठेवून चालणे, जनावरांना मारून त्यांचे व्हिडिअाे पाेस्ट करणे. कित्येक मुले तर या स्टेपवर गेम साेडून देत हाेते. मात्र, यानंतरही जी मुले ग्रुप बनवून राहत हाेती, त्यांना ते विशेष असल्याचे ताे भासवायचा. त्यामुळे, आपण काहीतरी खास आहोत म्हणूनच या ग्रुपमध्ये आपले स्थान कायम असल्याची भावना मुलांमध्ये जागृत व्हायची. मग त्यासाठी ही मुले काहीही करण्यासाठी तयार असायचे. हा संपूर्ण खेळ जीव देईपर्यंत सुमारे ५० दिवस चालायचा. २०१५पर्यंत रशिया १५ मुलांनी या गेमच्या नादी लागून अात्महत्या केली; परंतु यातील सर्वांनी साेशल मीडिया ग्रुपच्या अॅडमिनने सांगितल्यानुसार सर्व कंटेट अापल्या माेबाइल व लॅपटापमधून डिलीट करून टाकला हाेता. त्यानंतर एका मुलीमुळे 
 
तपास संस्थेला फिलीपविरुद्ध अनेक पुरावे मिळाले.
अन्य किशोरवयींनांप्रमाणे तीसुद्धा सोशल नेटवर्कवर खूप वेळ घालवायची. भितीदायक छायाचित्रांचे लिंक क्लिक करत करत ती फिलीप चालवत असलेल्या “सुसाइड ग्रुप’पर्यंत पोहोचली होती. मुलीने तपास यंत्रणेला सांगितले की, इंटरनेटवर असे हजारो ग्रुप आहेत. इतरांप्रमाणे मलाही अनेक टास्क दिलेली होती. ती मी पूर्ण केली. या दरम्यान फिलिपशी संपर्क झाला. मला एका छोट्या ऑनलाइन ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले. त्यानंतर रोज मध्यरात्री मोबाइलवर हॉरर व्हिडिओ येऊ लागले.

यात किशोरवयीनांना उंच इमारतींवरून उडी घेताना दाखवले जायचे. लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाच्या या व्हिडिओने ही मुलगी त्रासली होती. तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, एक तर आत्महत्या करावी किंवा इतरांचा जीव घ्यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. जेव्हा ग्रुप सोडण्याबद्दल सांगायची तेव्हा ग्रुप अॅडमिनकडून मला धमकीवजा तसेच अश्लिल संदेश यायचे. 

जेव्हा या गेमची शेवटची पायरी गाठण्याविषयी सांगण्यात आले तेव्हा ती घाबरली. पण, तोपर्यंत फिलीप हा आत्महत्येच्या पर्यायासह तयार होता. त्याने मुलीला सांगितले की, जर तुला उंचीची भीती वाटत असेल तर तु रेल्वेपुढे उभी राहा. त्याचीही भीती असेल तर झोपेच्या गोळ्या घेऊन कायमचीच झोपून जा. या मुलीला योगायोगाने वेळीच वाचवण्यात आले आणि नंतर फिलिपलाही अटक करण्यात आली. फिलिपच्या मते, ब्ल्यू व्हेल ही समुद्र किनाऱ्यावर मरण्यासाठीच येते म्हणून या गेला ब्ल्यू व्हेल नाव दिले. तपास संस्थेला फिलीपविरुद्ध अनेक पुरावे मिळाले.

अन्य किशोरवयींनांप्रमाणे तीसुद्धा सोशल नेटवर्कवर खूप वेळ घालवायची. भितीदायक छायाचित्रांचे लिंक क्लिक करत करत ती फिलीप चालवत असलेल्या “सुसाइड ग्रुप’पर्यंत पोहोचली होती. मुलीने तपास यंत्रणेला सांगितले की, इंटरनेटवर असे हजारो ग्रुप आहेत. इतरांप्रमाणे मलाही अनेक टास्क दिलेली होती. ती मी पूर्ण केली. या दरम्यान फिलिपशी संपर्क झाला. मला एका छोट्या ऑनलाइन ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवण्यात आले. त्यानंतर रोज मध्यरात्री मोबाइलवर हॉरर व्हिडिओ येऊ लागले. यात किशोरवयीनांना उंच इमारतींवरून उडी घेताना दाखवले जायचे. 

लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाच्या या व्हिडिओने ही मुलगी त्रासली होती. तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, एक तर आत्महत्या करावी किंवा इतरांचा जीव घ्यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. जेव्हा ग्रुप सोडण्याबद्दल सांगायची तेव्हा ग्रुप अॅडमिनकडून मला धमकीवजा तसेच अश्लिल संदेश यायचे. जेव्हा या गेमची शेवटची पायरी गाठण्याविषयी सांगण्यात आले तेव्हा ती घाबरली. पण, तोपर्यंत फिलीप हा आत्महत्येच्या पर्यायासह तयार होता. त्याने मुलीला सांगितले की, जर तुला उंचीची भीती वाटत असेल तर तु रेल्वेपुढे उभी राहा. त्याचीही भीती असेल तर झोपेच्या गोळ्या घेऊन कायमचीच झोपून जा. या मुलीला योगायोगाने वेळीच वाचवण्यात आले आणि नंतर फिलिपलाही अटक करण्यात आली. फिलिपच्या मते, ब्ल्यू व्हेल ही समुद्र किनाऱ्यावर मरण्यासाठीच येते म्हणून या गेला ब्ल्यू व्हेल नाव दिले.
बातम्या आणखी आहेत...