आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 रुपयांचे नाणे बंद झालेले नाही; बँकांच्या स्पष्टीकरणानंतरही गोंधळ कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 रुपयांचे नाणे बंद झालेले नाही - आरबीआय - Divya Marathi
10 रुपयांचे नाणे बंद झालेले नाही - आरबीआय
औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून मुंबई, औरंगाबाद, नाशिकसह देशभर विविध ठिकाणी 10 रुपयांचे नाणे बंद झाल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे, सामान्य ग्राहकांसह व्यापारीही गोंधळून गेले आहेत. विशेष म्हणजे नाणे बंद झाले नसल्याबाबत रिझर्व्ह बँकने  स्पष्टीकरण दिले, तरीही गोंधळ कायम आहे. 
 
बँकांवर बोजा झाल्याने अफवांमध्ये भर
काही लोक नाणे बंद झाल्याच्या अफवेने मोठ्या प्रमाणावर बँकेत नाणी जमा करण्यासाठी बँकेत गर्दी करत आहेत. अशात बँकांवरही सुद्धा कामाचा ताण वाढला आहे. काही बँकांनी तर ही नाणी घेणेच नाकारले. त्यामुळे अफवांमध्ये आणखी भर पडली.  
 
आरबीआयच्या स्पष्टीकरणानंतरही जैसे थे
दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याच्या अफवेने बहुतांश ग्राहक मुद्दामहून दुकानदारांना वस्तूंच्या किंमतीपोटी ही नाणी  देत आहेत. काही व्यापारी नाणे स्वीकारत नाहीत, तर काहींनी स्वीकारून बँकांमध्ये भरणा करण्याचा सपाटा लावला आहे. साऱ्यांनी ही नाणी चलनात ठेवावीत, असे आवाहन बँकांनी केले. अखेर पंधरा दिवसांपूर्वीच बँकांनी दहा रुपयांचे नाणे बंद झाले नाही, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतरही नाणे न स्वीकारण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: किराणा मर्चंट, पेट्रोल पंप आणि डेली निड्स सेंटर्सवर अधिक नाणी येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे काही ठिकाणी वादही उद्भवत आहेत.
 
पेट्रोल पंप आणि बँकांवर ताण
नाणे बंद झाल्याच्या अफवेने सामान्य ग्राहक मुद्दामहून पेट्रोल पंपांवर शे-दोनशेची नाणी देत आहेत. ही नाणी मोजायला वेळ लागत असल्याने काही पेट्रोल पंपचालक ते न स्वीकारण्याची भूमिका घेतात. यातूनच वाद निर्माण होत आहेत. जर नाणी घेतलीच तर ती एकदम मोठ्या प्रमाणावर बँकांमध्ये जमा करण्यासाठी जात आहेत. परिणामी बँकांवरही त्याचा ताण येत आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, काय म्हणतात व्यावसायिक आणि बँका..?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...