आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Next Week Unseasonal Rain Starts Weather Expert Estimation

पुढचा आठवडा अवकाळीचा, हवामानतज्ज्ञांचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड शहरात पावसामुळे असे तळे साचले. - Divya Marathi
नांदेड शहरात पावसामुळे असे तळे साचले.
औरंगाबाद - मराठवाड्याला सोमवारी अवकाळीने झोडपले. नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी, तर हिंगोलीत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नांदेड शहर, मुखेड, देगलूर, अर्धापूर, हदगाव या तालुक्यांसह उमरगा, तुळजापूर, परंडा भागात पाऊस झाला.

वीज पडून दोघांचा मृत्यू
हदगाव तालुक्यात वीज पडून रुक्मिणबाई गुलाबराव देशमुख (६०, आमगव्हाण) यांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील चेंडकाळ शिवारात वीज पडून भास्कर जाधव (५०) या शेतकऱ्याचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले.

पण मान्सूनवर परिणाम नाही
हवामान बदलांमुळे आठ दिवस राज्यात अवकाळी पाऊस शक्य आहे. मात्र, याचा मान्सूनवर परिणाम होणार नसून अल निनो चक्रीवादळाचाच जास्त धोका असल्याचे राज्य हवामान विभागाचे सल्लागार डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले.

कारण : दक्षिण-मध्य भारतात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण. हिंदी महासागर, बंगाल उपसागर, अरबी समुद्रातील भूपृष्ठ भागातील पाण्याचे
तापमान वाढले आहे.

असा अंदाज
विशाखापट्टणमजवळ रविवारपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सोमवारी आंध्र, कर्नाटकात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे मराठवाड्यात पाऊस झाला. हे वातावरण ४८ तास कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलका वा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवली आहे.