आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानतळ नाइट पार्किंग घाट्याचा सौदा ठरण्याची भीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अौरंगाबाद विमानतळ नाइट पार्किंगसाठी सज्ज असल्याचा दावा विमानतळ प्राधिकरणाकडून केला जात असला तरी विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या याबाबत साशंक आहेत. नाइट पार्किंगदरम्यान विमान कंपन्यांनी विमानाच्या देखभालीसाठी आपापल्या स्तरावर स्वतंत्रपणे हँगर्सची सुविधा निर्माण करावी, असे प्राधिकरणाचे मत आहे. मात्र, हँगर्स उभारणे व्यवहार्य नसल्याचे विमान कंपन्यांचे मत आहे. शिवाय रात्री येताना आणि सकाळी येथून जाताना विमान रिकामेच न्यावे लागणार असल्यामुळे हा घाट्याचा सौदा ठरण्याची विमान कंपन्यांना भीती वाटते.

मुंबई आणि पुणे विमानतळावर गर्दी झाल्यामुळे विमानांना रात्रीच्या वेळेस पार्किंगचा मोठा प्रश्न येतो. यामुळे विमान कंपन्या आपल्यापासून जवळच्या आणि अधिक गर्दी नसणाऱ्या विमानतळावर पार्किंगचा शोध घेतात. यातून त्या शहरात विमानाची वर्दळ वाढते. प्रवाशांची सोय होते आणि पार्किंगच्या बदल्यात विमानतळाला किराया मिळतो. औरंगाबाद विमानतळाच्या २००९ मध्ये झालेल्या विस्तारीकरणानंतर येथे नाइट पार्किंग व्हावी यासाठी विमानतळ प्राधिकरण सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नाही. यामागे तांत्रिक आणि आर्थिक अशी दोन्ही कारणे आहेत.

विमानतळ प्राधिकरण तयार
नाइटपार्किंगसाठी सज्ज असल्याचा दावा विमानपत्तन निदेशक आलोक वार्ष्णेय यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर एका वेळी विमाने उभी राहतील असे एकूण बे आहेत. पैकी ठिकाणी एअरोब्रिज आहेत. नाइट सिक्युरिटी आणि धावपट्टीवर भरपूर प्रकाश आहे. नाइट पार्किंगसाठी हँगर्सची गरज असते. विमान उभे राहिल्यावर रात्री त्याचे मेंटेनन्स करावे लागते. यासाठी विमानतळावर खास वर्कशॉपसारखी व्यवस्था लागते. इंजिनिअर, मेकॅनिकची गरज पडते. ही व्यवस्था विमान कंपन्यांनी करावी, असे वार्ष्णेय यांचे म्हणणे आहे. मात्र, एका आघाडीच्या कंपनीने ही बाब अमान्य असल्याचे सांगितले. कोट्यवधी रुपये खर्चून ही व्यवस्था तयार करणे फायदेशीर नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही सेवा विमानतळ प्राधिकरणाने पुरवायला हवी, असे ते म्हणाले.

उड्डाणाच्या वेळा अडचणीच्या
नाइट पार्किंग करणाऱ्या विमानांचे मुख्य टार्गेट परदेशातून येणारे प्रवासी असतात. मुंबई आणि दिल्लीच्या विमानतळांवर अमेरिका, इंग्लंड आणि अन्य देशांतून सहसा रात्री १२ ते दरम्यान विमाने येतात. मुंबई आणि दिल्लीसह सर्वच विमानतळे सकाळी वाजता सुरू होतात. म्हणजेच या शहरात परदेशातून आलेल्या प्रवाशांना दुसऱ्या शहरात जाण्यासाठी विमानांना वाजेपूर्वी पोहोचावे लागेल. मुंबईचा ४५ मिनिटांचा प्रवास लक्षात घेता औरंगाबादेतून किमान वाजता, तर दिल्लीचा पावणेदोन तासांचा प्रवास लक्षात घेता विमानांना तीन वाजता येथून निघावे लागेल. एवढ्या पहाटे औरंगाबादेतून प्रवासी मिळणार नाहीत. थोडे प्रवासी मिळाले तर त्यांना दिल्ली, मुंबईत पोहोचून फायदा होणार नाही. उलट तेथे ताटकळत बसावे लागेल. विमाने रिकामे न्यावे लागेल, हे परवडणारे नाही असे त्यांनी सांगितले.

नाइटपार्किंग नाही व्यवहार्य : एअरलाइन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार विमान जोपर्यंत हवेत आहे, तोपर्यंतच ते कंपनीला फायदा मिळवून देते. उभे विमान फायदा देत नाही. विमान कंपन्या प्रत्येक व्यवहार हा फायद्यासाठी करतात. मात्र, ही सेवा कोणत्याच दृष्टीने फायद्याची नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नाइट पार्किंग रात्री ११ ते सकाळी या वेळेत केली जाते. रात्री या वेळेस औरंगाबादेत येण्यासाठी विमानाला प्रवासी मिळण्याची शक्यता नसल्याचे त्यांचे मत आहे. या विमानात शहरातील प्रवासी आले तर त्यांना घरी जाता येईल. मात्र, हा वर्ग वगळता अन्य सर्वांनाच हॉटेलात मुक्काम करावा लागेल.

आम्ही सज्ज
नाइटपार्किंगसाठी विमानतळावर सर्व सुविधा आहेत. हँगर्सची सुविधा संबंधित विमान कंपन्यांनी करायची असते. आम्ही तयार आहोत. कोणत्याही क्षणी ऑपरेटरने सांगितल्यास दुसऱ्या दिवसापासून सेवा देण्यास आम्ही तयार आहोत. आलोक वार्ष्णेय, विमानपत्तन निदेशक
बातम्या आणखी आहेत...