आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड. नीलेश घाणेकरांना २५ दिवसांनंतर जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बनावट गोळीबार प्रकरणात अॅड. नीलेश घाणेकरांना २५ दिवसांनंतर नियमित जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात आरोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक रविवारी दुपारी चार ते पाचच्या दरम्यान गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावणे तसेच तपासात कोणताही हस्तक्षेप करणार नाही या अटींवर त्यांना न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी जामीन दिला. मंगळवारी खंडपीठात सुनावणी झाली. गोळीबार प्रकरणात २३ मे रोजी घाणेकरांना पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी दोन दिवसांच्या आणि २६ मे रोजी एक दिवसाच्या पोलिस कोठडीनंतर त्यांची हर्सूल तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. आज झालेल्या सुनावणीच्या वेळी आरोपीकडून तपासात हस्तक्षेप होईल, अशी शंका सरकारी वकिलाने उपस्थित केली. घाणेकरांकडून अॅड. शिरीष गुप्ते, अॅड. अशोक मुंदरगी, अॅड. वाल्मीक शेवाळे, अॅड. सोमनाथ लड्डा, अॅड. राजेद्र देशमुख, अॅड. माधवेश्वरी ठुबे-म्हसे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षातर्फे अॅड. डी. आर. काळे यांनी युक्तिवाद केला.