आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रियल 'हिरो'ने नाकारला होता महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍कार; वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निळू फुले - Divya Marathi
निळू फुले

औरंगाबाद - सध्‍या सबंध महाराष्‍ट्र 'महाराष्‍ट्र भूषण' पुरस्‍काराच्‍या राजकाराने ढवळून निघाला आहे. एक गट म्‍हणतो की, बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्‍कार देऊ नये तर दुसऱ्या गटाकडून पुरंदरे हेच या पुरस्कारासाठी योग्य आहेत, हे सांगितले जात आहे. परिणामी, या प्रतिष्ठित पुरस्‍कारावरून सध्‍या वाद रंगला आहे. पण, महाराष्‍ट्रातील एक असाही रियल '‍हिरो' आहे ज्‍याने की नम्रपणे हा पुरस्‍कार नाकारला होता. एवढेच नाही आपल्‍यापेक्षा अधिक सामाज कर्य करणारे आहेत, हे सांगून त्‍यांना पुरस्‍कार देण्‍याचे सूचवले होते. निळू फुले असे पुरस्‍कार नाकारणाऱ्या त्‍या गुणी अभिनेत्‍याचे नाव आहे.
कधी नाकारला फुले यांनी पुरस्‍कार
निळू फुले यांचे महाराष्‍ट्राच्‍या चित्रपट, नाट्य क्षेत्रातच योगदान नाही तर सामाजिक क्षेत्रातही त्‍यांनी भरीव काम केलेले आहे. सेवादलाच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी सामाजिक कार्यात स्‍वत:ला वाहून घेतले होते. फुले-शाहू-आंबेडकरांच्‍या विचारांचा त्‍यांच्‍यावर पगडाच नव्‍हता तर ते त्‍यांचे विचार प्रत्‍यक्ष जगत असत. त्‍यामुळेच राज्‍य शासनाने वर्ष 2003 मध्‍ये निळू फुले यांना महाराष्‍ट्र भूषण पुरस्‍कार देण्‍याचे ठरवले होते. ही बाब निळूभाऊंना कळताच त्‍यांनी या पुरस्‍कार स्‍वीकारण्‍यास नम्रपणे नकार दिला. एवढेच नाही तर या पुरस्‍कारासाठी योग्‍य व्‍यक्‍तींची आणि समाजासाठी झोकून देणाऱ्यांची नावेही सूचवलीत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा नेमका कुणाला दिला जातो महाराष्‍ट्र भूषण....