आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमा’चा विविध मागण्यांसाठी आज बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । नॅशनल इंडिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे (निमा) विविध मागण्यांसाठी मंगळवारी एकदिवसीय देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. यात निमा सदस्यांसोबतच बीएएमएस व बीयूएमएस डॉक्टरही सहभागी होणार आहेत.
‘निमा’च्या मागण्या अशा : 2 जुलै रोजी लखनऊ येथे निमाच्या मोर्चावर लाठीमाराची चौकशी करावी. केंद्र सरकारने बीआरएमएस व बीआरएचसी असे वैद्यकीय क्षेत्रातील अल्प कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करून ग्रामीण भागात निकृष्ट दर्जाची सेवा पुरवण्याचा घाट घातला आहे. त्याला संघटनेचा विरोध आहे. सर्वच डॉक्टरांसाठी जाचक ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अँक्ट’मधील तरतुदींना संघटनेचा विरोध आहे. आरोग्य विधेयक पारित करण्यापूर्वी त्यात योग्य ते बदल करून विधेयक सादर करावे. बीएएमएस, बीयूएमएस डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय उपचारांच्या बिलांचा शासकीय व अशासकीय विमा कंपन्यांद्वारे स्वीकार करण्यात यावा.
सर्व बीएएमएस, बीयूएमएस डॉक्टरांनी मंगळवारी बंद पाळून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन ‘निमा’चे शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. जगदीश गिते यांनी केले आहे.