आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रांती चौकात लोडिंग रिक्षात सापडली गुटख्याची नऊ पोती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिग्नल तोडून जाणाऱ्या लोडिंग रिक्षाचालकाला पकडून कागदपत्रांसह रिक्षाची तपासणी करताना नऊ पोती गुटखा आढळला. वाहतूक पोलिसांनी जावेद खान नासेर खान (२८, रा. सिल्क मिल कॉलनी) यास ताब्यात घेतले. त्याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौकातील सिग्नलवर जावेद खान हा लोडिंग रिक्षा (एमएच २० बीटी ४८८२) घेऊन थांबला होता. पोलिसांना पाहून त्याने सिग्नल तोडले. पोलिसांनी त्याला अडवून कागदपत्रांची मागणी केली. 

मात्र, कागदपत्रे नसल्याने रिक्षाची तपासणी सुरू केली. तेव्हा नऊ पोत्यांमध्ये दोन कंपन्यांचा गुटखा आढळून आला. त्याला ताब्यात घेत क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकाराची माहिती अन्न औषधी प्रशासनाला कळवण्यात आली. दरम्यान, हा गुटखा कैसर कॉलनीतील अजमत भाई नावाच्या व्यक्तीचा असल्याची कबुली जावेद खान याने पोलिसांना दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...