आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ उपकेंद्रांत आरोग्य सेवा कोलमडली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
सोयगाव- तालुक्यातील बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रासह नऊ उपकेंद्रांतील आरोग्य सेवा कोलमडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.
बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३२ गावे येतात. सर्व सामान्यांच्या आरोग्यासाठी बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गोंदेगाव, हनुमंतखेडा, पळाशी, निंभारा, नांदगाव, वडगाव, किन्ही, पहुरी आदी नऊ आरोग्य उपकेंद्रांमध्ये सोई-सुविधांचा अभाव दिसून येतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलशुद्धीकरणासाठी आवश्यक असलेले उपकरणही उपलब्ध नाही. नऊ उपकेंद्र नावालाच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यातील काही केंद्रांना इमारतींची आवश्यकता आहे.
सात पदे रिक्त
बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अनेक दिवसांपासून सात पदे रिक्त आहेत. त्यामध्ये आरोग्य सहायक २, आरोग्य सहायिका १, आरोग्य सेवक २, आरोग्य सेविका १ आणि एक वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे.

रिक्त पदे त्वरित भरण्यात येतील
बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेली अपूर्ण कामे लवकरच हाती घेण्यात येतील. तसेच रिक्त पदेही भरण्यात येतील.
भीमाशंकर जमादार, आरोग्य अधिकारी
बातम्या आणखी आहेत...