आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीतून नऊ घरफोड्या; ग्रामस्थांनी एकास पकडले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - नायगाव येथील बकवालनगरात एकाच रात्रीत नऊ घरफोड्या क रून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार होणार्‍या घरफोड्यास ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शुक्रवारी (20 सप्टेंबर) भल्या पहाटे सव्वातीनच्या सुमारास घडली. वाघवीर रावसाहेब काळे असे पकडलेल्या घरफोड्याचे नाव आहे. याप्रकरणी वाळूज पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

सरपंच योगेश दळवी हे कुटुंबासह येथील बकवालनगरात राहतात. चोरट्यांनी त्यांच्या घराची बाहेरून कडी घालून लगतच्या बंद खोलीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला असता दळवी यांना जाग आली. त्यांनी पाठीमागील दारातून बाहेर येऊन बघितले तेव्हा तीन जण हातात बॅग घेऊन पळताना त्यांना दिसले. त्यांनी काठी घेऊन चोर-चोर म्हणत त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांच्या आवाजामुळे गल्लीतील अनेक जण जागे होऊन ग्रामस्थांनी पाठलाग क रून वाघवीर काळे या घरफोड्याला पकडण्यात यश मिळवले. मात्र, सुरेश काळे व राजू जगताप क ाळे हे दोघे अंधाराचा फ ायदा घेऊन पसार झाले.

घरफोड्यास पकडल्याने त्याच्याजवळ सर्व ग्रामस्थ जमा झाले. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी 8 घरे फोडल्याचे निष्पन्न झाले.

यांची फोडली घरे
दळवी जागे झाल्यामुळे वाघवीर हा घरफोड्या पकडला गेला. नसता या घरफोड्या उघडकीस येणे कठीण होते. या घरफोड्यांनी दळवी यांच्या घराचे कुलूप तोडण्यापूर्वी तब्बल 8 घरे फ ोडली. त्यात पोपट साबळे यांचे रोख दोन हजार रुपये व दोन मोबाइल, गजानन दत्तात्रेय यांचा एक मोबाइल व कपडे, बापू पवार यांचे दोन मोबाइल व रोख 6 हजार 500 रुपये, मारुती पोळ यांचे दोन मोबाइल व त्यांच्या पत्नीच्या कानातील सोन्याचे झुंबर, मारुती टोणगे यांचा एक मोबाइल व रोख दीड हजार रुपये, मंगेश कदम यांचा एक मोबाइल व रोख दोन हजार रुपये, विश्वजित राठोड या विद्यार्थ्याचा एक मोबाइल व कागदपत्रे असलेली बॅग घेऊन घरफोड्यांनी दळवींच्या घराकडे मोर्चा वळवला होता. मात्र, त्यात ते यशस्वी झाले नाहीत. घरफोडी झालेल्या सर्वांच्या घरांचे कडीकोयंडे तोडून किंवा खिडक्या तोडून या घरफोड्या करण्यात आल्या आहेत. पकडलेल्या घरफोड्याकडून चोरीतील चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. त्याने घरफोडीची कबुली देऊन त्याच्या इतर साथीदारांची नावेही पोलिसांना दिली आहेत. दळवी यांच्या तक्रारीवरून वाळूज पोलिस ठाण्याचे जमादार एल. डी. तारक अधिक तपास करीत आहेत.