आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीच्या विद्यार्थ्याने केला अपहरणाचा बनाव, सीसीटीव्‍ही फुटेजमुळे फुटले बिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भरदिवसा कारमधून अपहरण करत पडेगावला नेऊन सोडल्याचे सांगत नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या विद्यार्थ्याने अपहरणाचा बनाव केला. हा प्रकार सोमवारी उघडकीस आला. मात्र, या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. 

नवव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सोमवारी सायंकाळी अचानक कुटुंबीयांसह छावणी पोलिस ठाण्यात आला. आपले कारमधून अपहरण करून पडेगावला नेले. तेथे सोडून कार चालक पसार झाला,असेे त्याने सांगितले. त्याने कारचा क्रमांकही दिला. पोलिसांनी कारचा शोध घेतला असता ती एका प्राचार्याची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्राचार्याच्या महाविद्यालयात धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा ही कार दिवसभर महाविद्यालयात असल्याचे स्पष्ट झाले. 
 
बातम्या आणखी आहेत...