आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेया घोषालच्या आवाजाला मराठवाड्यातील तरुणाचा स्वरसाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राइम-टाइमच्या सेटवर गायिका श्रेया घोषालसह निरंजन. - Divya Marathi
प्राइम-टाइमच्या सेटवर गायिका श्रेया घोषालसह निरंजन.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मराठीतील प्राइम-टाइम नावाच्या चित्रपटाला शहरातील निरंजन दीपकराव पेडगावकर या तरुणाने संगीत दिले आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. मूळ जालना येथील रहिवासी असलेल्या निरंजनने अवघ्या २७ व्या वर्षी हे यश मिळवले आहे. त्याच्या संघर्षाविषयी घेतलेला हा आढावा.

प्राइम-टाइम हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात निरंजन पेडगावकर यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले. यात 'पावसात वेडे मनमोर नाचले' हे गाणे प्रख्यात गायिका श्रेया घोषालने गायिलेले आहे. एवढ्या मोठ्या गायिकेने गायिलेले गाणे मराठवाड्याच्या तरुणाने संगीतबद्ध केले, ही औरंगाबाद व जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानाचीच बाब आहे. केवळ संगीतच नव्हे, तर त्याने या चित्रपटात 'आली लहर, केला कहर' हे गाणेही गायले आहे. निरंजनचे वडील दीपकराव पेडगावकर हे जालना नगरपालिकेत, तर आई शिक्षिका आहेत.

'कॅसिओ'ने बदलला करिअरचा ट्रॅक :निरंजन चौथीत असताना ते सहकुटुंब दक्षिण भारतामध्ये फिरायला गेले होते. तेव्हा तिथे एका दुकानात कॅसिओ दिसला. तो घेण्यासाठी निरंजनने वडिलांकडे हट्ट धरला. वडिलांनी तो घेऊन दिला. परतीचा प्रवासात निरंजनने त्या कॅसिओवर अनेक गाण्यांच्या चाली वाजवल्या. तोच गुण त्याच्या वडिलांनी हेरला व त्याला संगीतवाद्य शिकवणी सुरू केली. येथेच त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि त्याचे करिअरही घडले.

सहायक ते संगीत दिग्दर्शक
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरंजन मुंबईतच स्ट्रगल करीत होता. या काळात रोहित नागभिडेंसोबत "टपाल', 'तप्तपदी' या चित्रपटांमध्ये सहायक म्हणून काम केले. नंतर प्राइम-टाइमच्या निर्मात्यांना भेटून त्याने संगीतबद्ध केलेली गाणी ऐकवली. तेव्हाच त्याला ग्रीन सिग्नल मिळाला.

पुढे वाचा... संगीत, कला या क्षेत्रात मुंबईत येऊन स्ट्रगल करण्यासाठी पेशन्स महत्त्वाचे असतात