आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Patil News In Marathi, Congress, Aurangabad Lok Sabha Constituncy

15 वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासाला खीळ - नितीन पाटील.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - गेल्या 15 वर्षांमध्ये जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे जनमानसात मोठी नाराजी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नितीन पाटील यांनी केले.


वाळूज येथे शुक्रवारी रात्री आयोजित प्रचार सभेत पाटील बोलत होते. आमदार सुभाष झांबड, लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर, विश्वजित चव्हाण, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरदचंद्र अभंग, सहकारी संस्था संचालक बबनराव गायकवाड, सईदाबी पठाण यांची या वेळी उपस्थिती होती. प्रारंभी कै. जीवनलाल पाटणी प्रवेशद्वारापासून ढोल-ताशांच्या गजरात गावातून प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीची ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर सांगता झाली. त्यानंतर तेथे जाहीर सभा घेण्यात आली.