आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Patil News In Marathi, Congress Cadidature Of Lok Sabha, Aurangabad

विकासाचा रोड मॅप हाच माझ्या प्रचाराचा मुद्दा, नितीन पाटील यांची ‘दिव्य मराठी’ला भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहर आणि परिसराच्या विकासाचा रोड मॅप हाच माझ्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार नितीन पाटील यांनी सांगितले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी संपादकीय सहकार्‍यांशी बातचीत केली. ते म्हणाले की, शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात गेल्या अनेक वर्षांपासून शहराची काय अवस्था झाली हे सर्व मतदारांना माहितीच आहे. मात्र, माझ्या प्रचाराचा मुद्दा विरोधकांनी काय केले, यापेक्षा मी काय चांगले करू शकतो, हाच राहणार आहे. डीएमआयसी (दिल्ली-मुंबई कॉरिडोर)च्या माध्यमातून अनेक मोठे प्रकल्प येणार आहेत. त्यात लोकप्रतिनिधीची जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे.

परदेशी आणि भारतातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करणे. ते काम मी निश्चितच चांगले करू शकतो. या शहराला आता उद्योग आणि रोजगाराची गरज आहे, हा मुद्दाही मी प्रचारात मांडणार आहे. तिकीट नाकारल्यामुळे उत्तमसिंह पवार यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी मुंबईच्या बैठकीत मला आशीर्वाद दिला होता. त्यांची नाराजी लवकरच दूर होईल व एक हजार एक टक्का मी खैरेंचा पराभव करेल.