आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापािलका निघाली आॅनलाइनच्या दिशेने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट सिटीच्या दिशेने निघालेल्या औरंगाबाद मनपाला बराच पल्ला गाठायचा असला, तरी आॅनलाइन कामांच्या बाबतीत हालचालींना सुरुवात झाली आहे. मायनेट या साॅफ्टवेअरच्या माध्यमातून नागरिकांना करभरणा प्रमाणपत्रे, परवान्यांसाठी चकरा मारणे लवकरच टळणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विवाहनोंदणी प्रमाणपत्र देण्यास प्रारंभही झाला आहे.

औरंगाबाद महापालिका आता स्मार्ट सिटीच्या शर्यतीत उतरली असली, तरी त्यात प्रमुख निकष म्हणून नमूद केलेल्या संगणकीकृत आॅनलाइन सेवेबाबत मात्र मनपा बरीच मागे आहे. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात निवड होण्याच्या आधीच या आॅनलाइन सेवांबाबत पुढची पावले टाकण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरी सेवा प्रमाणपत्रांच्या संदर्भात नागरिकांना वेळ पैसे यांची बचत करून एकाच ठिकाणी काम होऊ शकणारी मायनेट ही संगणक प्रणाली वापरणे सुरू झाले आहे. आतापर्यंत फक्त करभरणाच या यंत्रणेमार्फत केला जायचा. आता विवाहनोंदणी प्रमाणपत्रे त्यात समाविष्ट करण्यात
आली आहेत. या यंत्रणेमार्फत पहिले प्रमाणपत्र नुकतेच वितरित करण्यात आले. राज्य सरकारने वर्ग महापालिका मोठ्या नगरपालिकांना मायनेटचा वापर करत नागरिकांना जलद तत्पर सेवा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मायनेटकाय आहे?
महापालिकानगरपालिकांचे नागरिकांशी संबंधित काम ध्यानात घेऊन मायनेट ही प्रणाली तयार करण्यात आली. त्यात मनपाचे नागरी सेवा पुरवणारे सर्व विभाग एकत्र जोडण्यात आले आहेत. त्यामुळे वाॅर्ड कार्यालयांतच विविध विभागांची कामे या एकाच प्रणालीवर होऊ शकतात. त्यासाठी ठिकठिकाणी चकरा मारायची गरज पडणार नाही. औरंगाबाद मनपात आतापर्यंत फक्त कर भरण्याचेच काम बऱ्यापैकी संगणकीकृत झाले अाहे, पण जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह प्रमाणपत्र, परवाने तक्रारी यांचे काम मात्र त्या त्या विभागात चकरा मारूनच करावे लागते.

प्रशासनाला काय फायदा?
विविधपरवाने प्रमाणपत्रे आणि नागरी सेवांसंदर्भातील अर्जांबाबत अधिक पारदर्शकता येणार.
दररोजच्या प्रशासकीय कामांत अधिक कार्यक्षमता येणार.
कामांबाबतच्या निर्णय प्रक्रियेत संगणकाचा वापर वाढल्याने उपलब्ध मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढणार.
काय फायदा?
वेगवेगळीप्रमाणपत्रे, परवाने नागरी सुविधांबाबतच्या अर्जांसाठी हेलपाटे टळणार.
नागरिकांचा वेळ पैसा वाचणार, नागरिकांच्या तक्रारींचेही लवकर होऊ शकणार निराकरण.
कर भरण्याशिवाय इतर कामेही या साॅफ्टवेअरच्या मदतीने होणार असल्याने प्रत्येकाचे रेकाॅर्ड आपोआपच संगणकीकृत होणार.