आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम पक्षामध्ये दादागिरी चालणार नाही, इम्तियाज जलील यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षात गेल्या दहा दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. याचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे पाठविण्यात आला अाहे. ज्यांना पक्ष सोडून जायचे आहे त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे. पक्षापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही. यापुढे पक्षात कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

पक्षाच्या विरोधात घोषणा
पक्षातबेशिस्तपणा केल्याच्या आरोपावरून जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर कुरेशी यांनी आमदार इम्तियाज जलील, डॉ. अब्दुल गप्फार कादरी यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशी जाहीर टीका केली होती. या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल करण्यात आला. त्यानंतर आरेफ कॉलनीचे नगरसेवक जमीर कादरी यांच्या समर्थकांनी आमदार इम्तियाज यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला. या वेळी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आमदार इम्तियाज जलील हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यस्त होते, त्याचवेळी पक्षामध्ये गांेधळ उडाला. जावेद कुरेशी यांनी आमदार इम्तियाज, डॉ. कादरी, मौलाना महेफुउर्र रहेमान यांच्यावर टीका केल्यानंतर पक्षात गटबाजी उफाळून आल्याचे चित्र होते. महानगरपालिकेतील आठ ते दहा नगरसेवक पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती.

अहवाल हैदराबादला
गोंधळ घालून पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या नगरसेवक, कार्यकर्त्यांचा अहवाल हैदराबादला पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आता ओवेसी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. - इम्तियाज जलील, आमदार.